Monday, May 6, 2024
घरमानिनीHealthमैत्रिणींनो बर्थ कंट्रोलची 'ही' नवी पद्धत जाणून घ्या

मैत्रिणींनो बर्थ कंट्रोलची ‘ही’ नवी पद्धत जाणून घ्या

Subscribe

नको असलेली प्रेग्नेंसी रोखण्यासाठी मार्केटमध्ये विविध बर्थ कंट्रोल पिल्सचा ऑप्शन उपलब्ध आहे. अशातच अप्रोडेक्टेड सेक्स केल्याच्या 24-48 तासांमध्ये बर्थ कंट्रोल पिल्स घेतली जाते. आता पर्यंत ज्या बर्थ कंट्रोस पिल्सचा वापर केला जात होता त्या सर्व पाण्यासोबत तुम्हाला घ्यायच्या होत्या. मात्र आता अशी एक बर्थ कंट्रोलची नवी पद्धत आली आहे त्यात तुम्ही पाण्याशिवाय ती पिल्स खाऊ शकता. (Birth control new method)

चावून खाल्ली जाणारी ही पिल्स अन्य बर्थ कंट्रोल प्रमाणेच काम करते. मात्र याचे सेवन करतेवेळी पाणी पिण्याची काहीज गरज नाही. तुम्ही ती चावून खाऊ शकता. या पिल्समध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टिन नावाचे दोन हार्मोन असतात. हे दोन्ही हार्मोन ओव्युलेशनला रोखणे आणि प्रेग्नेंसीचा धोका कमी करण्याचे काम करतात.

- Advertisement -

तुम्ही सर्वसामान्य बर्थ कंट्रोल पिल्स या चावून किंवा त्या क्रश करुन खाऊ शकत नाहीत. त्या अशा पद्धतीने बनवल्या जातात की, तुम्हाला तेव्हा पाणी प्यावेच लागते. पण चावून खाल्ल्या जाणाऱ्या बर्थ पिल्सचे फायदे आणि तोटे नक्की काय आहेत हे पाहूयात.

- Advertisement -

फायदे काय आहेत?
चावून खाल्ल्या जाणाऱ्या बर्थ कंट्रोलचा फायदा असा होतो की, त्या खाण्यास अगदी सोप्प्या असतात. ज्या महिलांना गोळी गिळण्यास समस्या येते त्यांच्यासाठी या पिल्स फायदेशीर आहे. अन्य बर्थ कंट्रोल पिल्स आणि चावून खाल्ली जाणारी पिल्स यामध्ये फारसा फरक नाही आणि समानच फायदे होतात.

नुकसान काय होते?
चावून खाल्ल्या जाणाऱ्या बर्थ कंट्रोल पिल्सचे सेवन प्रत्येकजण करु शकत नाही. बहुतांश महिलांना त्याची टेस्ट आवडत नाही. तर काही महिलांनी अशी तक्रार केली आहे की, ती दातात अडकली जाते. त्यामुळे तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर ती व्यवस्थितीत चावून खाल्ली पाहिजे. त्यानंतर एक ग्लास पाणी प्यावे. त्याचसोबत बर्थ कंट्रोल पिल्समुळे ब्लड क्लॉट बनण्याची समस्या उद्भवू शकते. ही समस्या त्या महिलांमध्ये दिसते ज्या स्मोकिंग करतात आणि ज्यांचे वय 35 वर्षापेक्षा अधिक असते.


हेही वाचा- गर्भनिरोधक गोळ्यांमुळे Irregular पीरियड्स येतात? वाचा तज्ञांचे मत

- Advertisment -

Manini