घरAssembly Session Liveज्यांच्यावर अविश्वास असेल त्यांना खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही-दानवे

ज्यांच्यावर अविश्वास असेल त्यांना खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही-दानवे

Subscribe

मागील आठवड्यामध्येच शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांनी पक्षांतर करुन त्या दुसऱ्या पक्षात गेल्या.

मुंबई ः ज्या उपसभापतींवर अविश्वास आणला असेल ते सभागृह कायद्याने कसे चालणार?, त्यामुळेच उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याविरुद्ध अपात्रतेची नोटीस आम्ही देऊन सभागृहातून बाहेर पडलो. तर ज्यांच्यावर अविश्वास असेल त्यांना खुर्चीर बसण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे परखड मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले. ते विधान परिषदेबाहेर असलेल्या प्रसार माध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, मागील आठवड्यामध्येच शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांनी पक्षांतर करुन त्या दुसऱ्या पक्षात गेल्या. मात्र, त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेने विधान परिषदेवर प्रतिनिधी म्हणुन पाठविले होते. त्यामुळेच हे पक्षांतर कायद्याच्या दृष्टीने योग्य नसून, कायद्याने निलम गोऱ्हे यांच्यावरही पक्षांतर बंदी कायद्यान्वये कारवाई होणार आहे. त्यामुळेच आम्ही आज विधान परिषदेच्या उपसभापती की ज्या सभापतींचेही कामकाज पाहतात. त्यांच्यावर अविश्वास आणून त्यांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी केली. याबाबत विधान परिषद सभागृहात आवाज उठवला असता आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही सभागृह त्यागला असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

- Advertisement -

सभागृहात ऐकून घेणारे आहे तरी कोण?-परब
सध्या सभागृहामध्ये सभापती नाही, तर उपसभापतींवर अविश्वास आहे. त्यामुळे सभागृहात ऐकून घेणारे जबाबदार व्यक्ती आहे तरी कोण असे म्हणत आमदार अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. ऐवढेच नव्हे तर उपसभापती असलेल्या निलम गोऱ्हे यांनी पक्ष सोडला आहे. कायद्याच्या 2-ए-अ-मधील टेन शेड्युलनुसार अपात्रतेची नोटीस देण्यात आली आहे. सध्या सभापती नाही. उपसभापतींवर अविश्वांसाचा ठराव आहे. त्यामुळे आम्ही वाॅक आऊट केले. घटनात्मक पदावर जेव्हा अविश्वास दाखविला जातो त्यांना त्या खुर्चीवर बसण्याची काही एक गरज नाही अशी भूमिका यावेळी आमदार अनिल परब यांनी स्पष्ट केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -