Saturday, September 23, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health ब्रा वापरण्याचे आणि न वापरण्याचे हे आहेत फायदे, तोटे

ब्रा वापरण्याचे आणि न वापरण्याचे हे आहेत फायदे, तोटे

Subscribe

ब्रा महिलांच्या आउटफिट मधील एक महत्त्वाचा हिस्सा आहे. जो तुमच्या अप्पर बॉडीला शेप आणि ब्रेस्टला सपोर्ट देण्यासाठी मदत करतो. मात्र काहीवेळेस ते घातल्याने अनकंम्फर्टेबल ही वाटते. ब्रा मुळे काही वेळेस खाज येणे, रॅशेज आणि खांद्यांवर स्ट्रॅपचे वळ उठतात. मात्र ब्रा घातली नाही तर बॉडीचा शेप बिघडलेला दिसतो. अशातच जाणून घ्या ब्रा घालण्याचे फायदे आणि नुकसान काय होतात.

ब्रा घालण्याचे आणि न घालण्याचे फायदे , तोटे

- Advertisement -

-अधिक घट्ट ब्रा घातल्याने ब्रेस्टच्या खालील एरियाजवळ ब्लड सर्कुलेशनवर परिणाम होतो. त्याच कारणास्तव महिलांच्या छातीत किंवा त्याच्या आजूबाजूला दुखत असल्याचे वाटते.

-ब्रा घालून न झोपल्याने उत्तम झोप लागते. कारण तेव्हा तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय श्वास घेऊ शकता. ब्रीदिंग आणि ब्लड सर्कुलेशनसाठी समस्या उद्भवत नाही.

- Advertisement -

-जर तुम्हाला अधिक घाम येत असेल तर ब्रा चे असे फॅब्रिक निवडा जे कंम्फर्टेबल असेल. घाम शोषून न घेणारे फॅब्रिक अजिबात निवडू नका. त्यामुळे छाती आणि ब्रा च्या कापडामध्ये सातत्याने घर्षण झाल्यास खाज आणि रॅशेजची समस्या होते.

-ज्या महिला पॅडेड ब्रा चा अधिक वापर करतात त्यांना माहिती असले पाहिजे की, यामुळे त्यांच्या निप्पलला समस्या उद्भवू शकते. कारण ते अत्यंत सेंसिटिव्ह असतात, त्यामुळे ते ड्राय होऊ लागतात. अशातच तेथे खाज येऊ शकते.

-एक्सपर्ट्स असे सांगतात की, गरज नसेल तर ब्रा घालू नये. कारण यामुळे स्तनांच्या कॅन्सरची शक्यता कमी होते. शेपच्या नादात अधिक घट्ट ब्रा घातल्याने ब्रेस्ट टिश्यूजला नुकसान पोहचू शकते.


हेही वाचा- हेव्ही ब्रेस्टसाठी ‘या’ आहेत परफेक्ट ब्रा

- Advertisment -

Manini