Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthब्रा स्ट्रैप सिंड्रोम म्हणजे काय?

ब्रा स्ट्रैप सिंड्रोम म्हणजे काय?

Subscribe

तुम्हाला सुद्धा खांदे, मान आणि पाठ आखडल्यासारखे होते का? तसेच काम करताना त्या ठिकाणी सतत दुखत असल्याने चिडचिड होते का? तुमच्यासोबत सुद्धा असेच होत असेल तर सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या ब्रा कडे लक्ष देण्याची गरज आहे. आता तुम्ही विचार कराल ब्रा आणि पाठ दुखीचा काय संबंध. खरंतर असे ब्रा स्ट्रैप सिंड्रोमच्या कारणास्तव होते. याच बद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Bra strap syndrome)

काही वेळेस महिला परफेक्ट फिगर आणि फिटिंगच्या नादात ऐवढी घट्ट ब्रा घालतात की, त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागतो. त्यांना या सिंड्रोम बद्दल कळत ही नाही. अधिक घट्ट आणि चुकीच्या साइजची ब्रा घातल्याने खांदे, मान आणि पाठीसह अन्य ठिकाणी दुखू लागते. या स्थितीला ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम असे बोलले जाते. मेडिकल भाषेत याला कॉस्टोक्लेविकुलर सिंड्रोम असे म्हटले जाते. ज्या प्रकारे चुकीच्या ब्रा घातल्याने पाठीवर डाग आणि लाल चट्टे येऊ शकतात. त्याचसोबत खांदे आणि मान सुद्धा दुखते. ही समस्या खासकरून अशा महिलांना होते ज्यांचे ब्रेस्ट हैवी असतात. त्या पातळ स्ट्रिप असणारी घट्ट ब्रा घालतात.

- Advertisement -

ब्रा स्ट्रैप सिंड्रोममुळे होणाऱ्या समस्या
-खांदे आणि मान खुप दुखते
-तुमची नर्व डॅमेज होऊ शकते
-स्नायू कमकुवत होऊ शकतात
-फिजिकल अॅक्टिव्हिटी केल्यानंतर अधिक दुखणे
-खांद्यांच्या येथे मुंग्या येणे

- Advertisement -

असा करा बचाव
-शक्य असेल तर काही दिवसांपर्यंत ब्रा फार कमी वेळ घाला
-स्ट्रॅपलेस आणि आपल्या साइजची ब्रा खरेदी करा
-दुखणे दूर करण्यासाठी 10 मिनिटे शेकवा
-योगा आणि एक्सरसाइज करा
-खांद्यावर अधिक जड बॅग घेऊ नका
-दुखणे अधिक वाढल्यास डॉक्टरांना संपर्क साधा


हेही वाचा- हेव्ही ब्रेस्टसाठी ‘या’ आहेत परफेक्ट ब्रा

- Advertisment -

Manini