Friday, September 29, 2023
घर मानिनी Health रात्री ब्रा घालून झोपत असाल तर होतील 'या' समस्या

रात्री ब्रा घालून झोपत असाल तर होतील ‘या’ समस्या

Subscribe

रात्री ब्रा घालून झोपणे खरंच आरोग्यासाठी सुरक्षित असते का? असा प्रश्न आपल्यापैकी सर्वच महिलांना पडतो. खुपजणी या बद्दल कंफ्युज ही असतात की, नक्की काय करावे. जर तुम्ही या बद्दल काही महिलांना विचारले तर त्यांच्याकडून तुम्हाला विविध उत्तरे मिळतील. अशातच चिंता करण्याची गरज नाही. एक्सपर्ट्स या बद्दल नक्की काय म्हणतातयत हे पाहूयात. (Sleeping with bra)

हेल्थ एक्सपर्ट्स असे म्हणतात की, रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपल्याने गंभीर आजार होत नाहीत. मात्र घाम आणि अधिक घट्ट ब्रा घातल्याने सुद्धा तुम्हाला अनकंम्फर्टेबल वाटू शकते. यामुळे रात्रीच्या वेळी घट्ट ब्रा घालून झोपू नये. प्रयत्न करा की, रात्रीच्या वेळी सैल ब्रा घालून झोपल्याने बॉडी शेप व्यवस्थितीत राहिल आणि तुम्हाला अनकंम्फर्टेबल सुद्धा वाटणार नाही. मात्र याचे काही नुकसान सुद्धा आहेत.

- Advertisement -

-फंगल इंन्फेक्शनचा धोका
दिवसभर ब्रा घातल्याने घाम येऊ शकतो. त्याच्या कारणास्तव ब्रेस्टच्या आसपासच्या त्वचेवर फंगस वाढण्याची शक्यता वाढू शकते. या स्थितीत फंगल इंन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. सर्वसामान्यपणे पावसाळ्यात ओलसर वातावरण असते त्यामुळे अशा प्रकारची समस्या होऊ शकते. तर उन्हाळ्यात दीर्घकाळापर्यंत ब्रा घातल्याने फंगल इंन्फेक्शन वाढू शकते.
त्यामुळे रात्रीच्या वेळी ब्रा काढून झोपणे फायदेशीर ठरू शकते.

-नर्व्सवर पडू शकतो दबाव
रात्रीच्या वेळी तुम्ही अधिक घट्ट ब्रा घालून झोपत असाल तर यामुळे भले तुमची बॉडी शेप योग्य राहिल. पण तुमच्या नर्व्सवर दबाव पडू शकतो. खरंतर ब्रा मध्ये इलास्टिक बेल्ट असतात आणि यामुळे आजूबाजूच्या त्वचेवर त्याचा परिणाम होतो.

- Advertisement -

-ब्लड सर्कुलेशनवर परिणाम
रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपल्याने ब्लड प्रेशरवर परिणाम होऊ शकते. खरंतर ब्रा मध्ये इलास्टिसीटी असते. याच कारणास्तव ती स्किनला चिकटली जाते आणि घट्ट होते. अशा स्थितीत रक्ताचा प्रवाह सुरळीत होत नाही. (Sleeping with bra)

-त्वचेवर येऊ शकते खाज
दीर्घकाळापर्यंत घट्ट ब्रा घातल्याने तुम्हाला खाज येण्याची समस्या उद्भवू शकते. मुख्य रुपात इलास्टिटी असणाऱ्या ठिकाणी स्किनवर दबाव पडतो आणि कधीकधी अधिक घाम आल्याने खाज सुद्धा येऊ शकते. त्यामुळे रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपत असाल तर तुमची ही समस्या वाढू शकते. त्यामुळे रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपण्यापासून दूर रहा.


हेही वाचा- ब्रा स्ट्रैप सिंड्रोम म्हणजे काय?

- Advertisment -

Manini