Thursday, April 18, 2024
घरमानिनीFashionपरफेक्ट फिटिंग 'ब्रा' वापरण्याचे फायदे

परफेक्ट फिटिंग ‘ब्रा’ वापरण्याचे फायदे

Subscribe

ब्रेस्टला शेपमध्ये ठेवण्यासाठी ‘ब्रा’ घातली जाते. यासाठी ‘ब्रा’ची योग्य फिटिंग असणे फार गरजेचे असते. अन्यथा संपूर्ण दिवसभर अनकंम्फर्टेबल वाटत राहते. ‘ब्रा’ ही विविध साइज आणि शेपमध्ये येते. प्रत्येक स्त्रीचे शरीर आणि तिची कपडे घालण्याची स्टाईल वेगळी असते. त्यानुसार स्त्रिया ‘ब्रा’ निवडतात. पण, अनेक महिलांकडून ‘ब्रा’च्या फिटिंग बाबत चुका होतात आणि अशाने अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे स्त्रियांनी ब्रेस्टच्या आकारापेक्षा मोठी आणि लहान ब्रा घातली तर शरीर बेढब दिसताच शिवाय आरोग्यालाही मोठी हानी होते.

एका सर्वक्षणात असे दिसून आले आहे की, जवळपास 70 ते 80 टक्के स्त्रिया या चुकीच्या आकाराच्या ब्रा घातल्यामुळे गंभीर आजारांना बळी पडत आहेत. कारण चुकीची ब्रा घातल्याने केवळ पाठ आणि मान दुखत नाही तर ब्रेस्ट कँसर, छातीत जळजळ, त्वचेवर पुरळ उठणे आणि डोकेदुखी यासारख्या समस्या जाणवतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी चुकीची ब्रा घालू नका.

- Advertisement -

पाठदुखीपासून आराम –
तुम्हाला पाठदुखीचा त्रास जाणवत असले तर ‘ब्रा साईझ’ चेक करा. कारण फिडींग करणाऱ्या महिला अनेकदा लहान आकाराच्या ब्रा घालतात. पण, असे केल्याने छातीवर दाब पडतो आणि हेवी ब्रेस्ट असल्याकारणाने महिला वाकतात. यामुळे पाठीच्या कण्यावर प्रेशर येते आणि पाठदुखी सुरु होते. त्यामुळे ब्रा निवडताना आकार योग्यच निवडा.

- Advertisement -

मानदुखीतुन सुटका –
खांदा आणि मान दुखण्याचे मुख्य कारण असते ते म्हणजे घट्ट ब्रा आणि त्याचे पट्टे. त्यामुळे हे सर्व टाळण्यासाठी योग्य आकारची ब्रा निवडणे अत्यंत महत्वाचे असते. तुम्हाला जर मानदुखी त्रास जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या ब्रा ची साईझ नक्की चेक करा.

त्वचा रोग होत नाही –
स्किन रॅशेस, स्किन प्रोम्ब्लेम टाळायचे असतील तुमच्या ‘ब्रा’ची फिटिंग योग्य आहे का नाही ते चेक करा. खूप जास्त सैल आणि खूप जास्त घट्ट ब्रा घातल्यामुळेही अनेक समस्यांना निमंत्रण मिळते. अशाने फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते.

ब्रेस्ट कँसरचा धोका कमी होतो –
परफेक्ट फिटिंगच्या ‘ब्रा’ने अनेक फायदे होतात. सर्वात महत्वाचे म्हणजे ब्रेस्ट कँसर चा धोका कमी होतो. कारण आजकाल महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे. खूप घट्ट ब्रा घातल्यामुळे ब्लड सर्क्युलेशनमध्ये अडथळा निर्माण होतो. काही वेळा तर ब्लड सर्क्युलेशन थांबते आणि ब्रेस्ट कँसर होतो. याशिवाय ब्रेस्ट लिगामेंट्स खराब होण्याचाही धोका वाढतो.

गुदमरणे –
चुकीच्या आकाराची ब्रा घातल्याने काही महिलांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवतो. गुदमरल्यासारखे जाणवते आणि रक्तप्रवाह कमी होतो.

डोकेदुखी जाणवत नाही –
परफेक्ट फिटिंग ब्रा मुळे डोके दुखायचे कमी होते. कारणचुकीची फिटिंग ब्रा तुमच्या मानेच्या आणि पाठीच्या स्नायूंना कधीही आधार देत नाही. त्यामुळे खांदेदुखी वाढते आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या डोक्यावर होतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी ब्रा साईझ योग्यप्रकारे निवडता येत नसेल तर स्त्रीतज्ञ यांच्याशी बोलून घ्या.

त्यामुळे स्त्रियांनी योग्य आकाराची ‘ब्रा’ निवडणे गरजेचे असते. अन्यथा तुम्हाला अनेक आजार होण्याचा धोका संभवतो. जर तुम्हाला तुमच्या ब्रेस्टनुसार योग्य साईझ निवडता येत नसेल तर स्त्रिया एखाद्या एक्सपर्टचा सल्ला घेऊ शकतात.

 

 


हेही वाचा : बॅकलेस ब्लाऊजच्या परफेक्ट फिटिंगसाठी टिप्स

 

 

 

- Advertisment -

Manini