Friday, May 3, 2024
घरमानिनीकेवळ १ ग्लास ताक प्यायल्याने होतात 'हे' फायदे

केवळ १ ग्लास ताक प्यायल्याने होतात ‘हे’ फायदे

Subscribe

ताक आणि दही दोन वेगवेगळ्या प्रकारचे डेअरी प्रोडक्ट्स आहेत. जरी ते दूधापासून तयार केले जात असले तरीही विविध गोष्टींमध्ये त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो. आयुर्वेदात ताक तुम्ही हे कधीही पिऊ शकतात. खासकरुन तुमचे दुपारचे जेवण झाल्यानंतर ते प्यावे. परंतु संध्याकाळी अथवा रात्रीच्या वेळी याचे सेवन करण्यापूर्वी वातावरण आणि कोणते ठिकाण आहे याकडे सुद्धा लक्ष द्यावे. जर तुम्हाला पोट दुखीची समस्या असेल तर ताक सकाळी उपाशी पोटी प्या. आता जाणून घेऊयात ताक पिण्याचे नेमके फायदे काय आहेत त्याचबद्दल अधिक.

- Advertisement -

-डिटॉक्सीफाइंग ड्रिंक
केवळ १ ग्लास ताक हे शरिराला आतमधून डिटॉक्सीफाय करण्यास मदत करते. हे आपल्या शरिरात जाऊन एक स्क्रब प्रमाणे काम करते. तसेच नसांमध्ये जमा झालेली घाण ही स्वच्छ करते. या व्यतिरिक्त शरिरात जमा झालेले बॉडी फॅटच्या कणांना सुद्धा नष्ट करण्यास मदत करते.

-पाचनसंस्थेचे काम सुरळीत होते
वेळोवेळी पाचनसंस्था स्वच्छ ठेवणे फार गरजेचे असते. अशातच एक ग्लास ताक तुम्ही प्यायलात तर ही समस्या दूर होऊ शकते. खरंतर हे एक प्रीबायोटिक ड्रिंक आहे. जे तुमच्या गट बॅक्टेरियासाठी काही प्रकारे फायदेशीर असते. हे तुमच्या आतड्यांना कार्याला वेग येतो आणि पोट स्वच्छ करण्यास मदत करते.

- Advertisement -

-पाण्याची कमतरता दूर करते
ताक पिणे तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात फार फायदेशीर ठरु शकते. हे इलेक्ट्रोलाइट युक्त असण्यासह त्यात काही प्रकारचे न्युट्रिएंट्स सुद्धा असतात. त्याचसोबत स्नायूंना ताकद देण्याचे काम ही करते. तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर असते.

-व्हिटामिन सी युक्त भरपूर
विटामिन सी युक्त असलेले ताक तुमचे रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट करते. तसेच ते तुमच्या हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करते. कारण विटामिन सी तुमच्या शरिरातील कॅल्शिअम अवशोषणासाठी मदत करतात. त्यामुळेच तुमची हाडं तंदुरुस्त राहतात.


हेही वाचा- वेट लॉससाठी Cranberry ज्यूस ठरेल फायदेशीर

- Advertisment -

Manini