Friday, May 10, 2024
घरमानिनीकॅम्पिंगचा प्लॅन करताय? मग 'या' टिप्स फॉलो करा

कॅम्पिंगचा प्लॅन करताय? मग ‘या’ टिप्स फॉलो करा

Subscribe

सध्या देशभरात थंडीची लाट पसरली आहे. याकाळात अनेक जणांनी मित्रांसोबत पिकनिकचे प्लॅन आखायला सुरुवात केली असेल. तरुण मंडळीनी तर कॅम्पिंगचे प्लॅन करायला सुरुवात केली असेल. कारण आजकाल तरुणांमध्ये कॅम्पिंगची क्रेझ जास्त आहे. अनेकांना तर माऊंटन बायकिंग, ट्रेंकिंग हे सुद्धा करायला आवडते. पण, बऱ्याच वेळा अति उत्साहामुळे सहलीच्या नियोजनादरम्यान छोट्या छोट्या चुका केल्या जातात किंवा नकळत होतात. ज्याने पूर्ण ट्रिप खराब होते. त्यामुळे कॅम्पिंग प्लॅन करताना योग्य तयारी करणे आवश्यक आहे. तुमचा पण कॅम्पिंगचा प्लॅन ठरला असेल तर ही बातमी पूर्ण वाचा.

टेन्ट –
कॅम्पिंग दरम्यान सर्वात महत्वाचे म्हणजे टेन्ट अर्थात तंबू. टेन्ट निवडताना त्याचा कापड मजबूत आहे की नाही ते तपासून घ्या. कारण वेगवेगळ्या ठिकाणी हवामान कसे असेल हे आपण कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे उत्तम मटेरियलचे टेन्ट निवडा. याशिवाय घरात टेन्ट उभारण्याची प्रॅक्टिस करा. जर तुम्ही पहिल्यादाच कॅम्पिंगचा अनुभव घेणार असाल तर त्यासाठी हे आवश्यक आहे. असे केल्याने तुम्हाला कॅम्पिंग डेस्टिनेशनवर टेन्ट लावताना अडचण येणार नाही.

- Advertisement -

स्लीपिंग बॅग –
मजबूत टेंटसोबत आपण स्लीपिंग बॅगही बाळगायला हवी. अशाने तुम्हाला रात्री झोपताना कोणती अडचण जाणवणार नाही.

टॉर्च किंवा फ्लॅश लाईट –
मोकळ्या जागी, डोंगर किंवा जंगलात वन्य प्राण्यांपासून धोका असतो. अशावेळी तुमच्याकडे फ्लॅश लाईट किंवा टॉर्च जवळ असणे गरजेचे आहे.

- Advertisement -

फस्टएड बॉक्स –
कॅम्पिंग करताना लहानशी फस्टएड किट सोबत असणे आवश्यक आहे. कारण, जर तुम्हाला दुखापत झाली तर ती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

How to plan a camping trip: 7 steps get you ready to camp | Advnture

हवामानानुसार नियोजन करा –
प्रवासाची आवड असणारे लोक वेळ मिळताच कोणत्याही ऋतूत प्रवासासाठी बाहेर पडतात. त्यामुळे त्यांना प्रवासादरम्यान अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी हवामानानुसार कॅम्पिंगचे नियोजन करा. जेणेकरून तुम्हाला तिथे गेल्यावर कोणतीही अडचण किंवा त्रास होणार नाही.

खाद्यपदार्थ आणि पिण्याचे पाणी –
कॅम्पिंगला जाण्यापूर्वी आपल्यासोबत पुरेसे पाणी, योग्य खाद्यपदार्थ जवळ बाळगा. ३-४ दिवसांसाठी जाणार असाल तर स्वतःसोबत स्वयंपाकाचे सामान आणि छोटा स्टोव्ह सोबत घ्या.

कॅम्पिंग ग्राऊंडची निवड करताना काळजी घ्या –
ज्या ठिकाणी कॅम्पिंगला जाणार असाल तर त्या ठिकाणची जमिनीबद्दल आधीच माहिती घ्या. जेणेकरून तिथे गेल्यावर तुम्हाला टेन्ट उभारताना त्रास होणार नाही.

 

 


हेही वाचा ; लहानपणी खेळा, आयुष्यभर फिट राहा

- Advertisment -

Manini