घरमहाराष्ट्रShrivardhan News : पर्यटकांचा नादच खुळा, असं काय घडलं की, पालिका झाली...

Shrivardhan News : पर्यटकांचा नादच खुळा, असं काय घडलं की, पालिका झाली सतर्क?

Subscribe

श्रीवर्धनमध्ये आलेल्या काही पर्यटकांनी वेगळीच शक्कल लढवली. त्यांच्या कृतीने स्थानिक व्यावसायिक नाराज झाले आणि श्रीवर्धन नगर परिषदही सतर्क झाली आहे.

श्रीवर्धन : पर्यटनासाठी कोकणात येणारे पर्यटक पैसे वाचवण्यासाठी नाना शक्कल लढवतात. त्यातील एक प्रकार नुकताच श्रीवर्धन समुद्रकिनारी उघडकीस आली. काही पर्यटकांनी चक्क सुशोभीकरण केलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर तंबू ठोकून मुक्काम केला. या प्रकारामुळे श्रीवर्धनमध्ये खळबळ उडाली असून नगर परिषदेनेही याची गंभीर दखल घेतली आहे.

समुद्रकिनारा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी या सुशोभीकरण केलेल्या बंधाऱ्यावर बसण्यासाठी सुविधा निर्माण करण्यात आली आहे. विविध प्रकारची शोभेची झाडे, फुलांची झाडे समुद्रकिनाऱ्यावरील या बंधाऱ्यावर लावण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे कोळंबी, खेकडा यांची प्रतिकृतीदेखील समुद्रकिनारी नुकतीच लावण्यात आली आहे. ७५२ किलोमीटर लांबीच्या कोकण किनारपट्टीवर फक्त श्रीवर्धन समुद्रकिनारी धूप प्रतिबंधक बंधारा बांधून त्याचे सुशोभीकरण केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Tourism : मुरूड, काशीदमध्ये पुन्हा पर्यटकांची पाऊले

रविवारी रात्री काही पर्यटकांनी बंधाऱ्यावरील पर्यटकांसाठी बसण्याची सुविधा केलेल्या जागेत चक्क तंबू ठोकून मुक्काम केला. पर्यटकाच्या या कृतीमुळे श्रीवर्धनमधील पर्यटनाशी निगडित असलेल्या व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारे पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर वास्तव्य करत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पर्यटक असे कुठेही राहिले तर त्यांची जबाबदारी कुणाची तसेच एखादी दुर्घटना घडली तर काय करणार, असा सवाल स्थानिक विचारत आहेत. त्यामुळे असा प्रकार पुन्हा होऊ नये, याची श्रीवर्धन नगर परिषदेने काळजी घ्यावी, अशी अपेक्षा स्थानिक व्यावसायिक करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad News : महामार्गांनी दिला रायगडमधील शेतकऱ्यांना रोजगार

असेही पर्यटक

अनेक वेळा पर्यटकांकडून श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याच्या बाजूलाच असलेल्या मठाच्या गवंडातील अवधूत मंदिराजवळ अन्न शिजवले जाते. तर काही पर्यटक पिकअप किंवा टेम्पो घेऊन आल्यानंतर आपापल्या गाड्यांमध्ये जेवण बनवताना दिसतात. यामुळे अधूनमधून स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते.

श्रीवर्धन नगर परिषद सतर्क

या प्रकारानंतर लगेचच नगर परिषदेचे कर्मचारी घटनास्थळी पाठवून पाहणी करण्यात आली. तसेच अशाप्रकारे कुणी वास्तव्य करताना आढळल्यास वरिष्ठांना कळवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

– विराज लबडे, मुख्याधिकारी तथा प्रशासक, श्रीवर्धन नगरपरिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -