Thursday, April 11, 2024
घरमानिनीCleaning Tips : काचेच्या वस्तू कशा स्वच्छ करायच्या

Cleaning Tips : काचेच्या वस्तू कशा स्वच्छ करायच्या

Subscribe

घर सजविण्यापासून ते स्वयंपाकघराचे सौंदर्य वाढविण्यापर्यत अनेक महिला काचेच्या वस्तूंचा वापर करतात. काचेच्या वस्तू घराच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करतातच पण, ते जितके सुंदर असतात तितक्याच त्या स्वच्छ करणे जोखमीचे काम असते. काचेच्या वस्तू साफ करताना एकतर त्या फुटण्याच्या किंवा आपल्याला लागण्याची भीती अधिक असते. अनेकदा तर काचेच्या वस्तूंवर कालातंराने पाण्याचे किंवा इतर गोष्टींचे डाग पडतात. हे डाग काढण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो केल्यात तर सहज काचेच्या वस्तू स्वच्छ करू शकता.

बेकिंग सोडा – कोणतेही फर्निचर स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा अगदी बेस्ट ऑप्शन आहे. एक कप पाण्यात थोडासा बेकिंग सोडा टाकून तुमचे काचेचे फर्निचर पूर्णपणे पुसून घ्या. ह्या हॅकने काचेवरील जुने डाग सहजरित्या निघतील.

- Advertisement -

लिंबू – काचेचे टेबल दररोज स्वच्छ न केल्यास काही काळानंतर त्याची चमक कमी होऊ लागते. अशावेळी लिंबू उपयुक्त ठरू शकतो. काचेच्या टेबलची चमक दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यावरील घाण काढण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर तुम्ही करू शकता.

- Advertisement -

विन्हेगर – शोपिसवरील डाग दूर करण्यासाठी व्हिनेगर तुम्ही वापरू शकता. यासाठी विन्हेगर पाण्यात टाकून चांगले मिक्स करा. काचेच्या छोट्या छोट्या वस्तू जर तुम्ही स्वच्छ करणार असाल तर त्या विन्हेगरच्या लिक्विडमध्ये थोडा वेळ टाकून ठेवा. काही वेळाने सर्व वस्तू स्पंजच्या साहाय्याने हलक्या हातांनी चोळून स्वच्छ करा.

अल्कोहोल – काचेची बाटली स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोल सुद्धा उत्तम पर्याय आहे. यासाठी हलक्या गरम पाण्यात अल्कोहोल मिक्स करा. तयार लिक्विडमध्ये कापड भिजवून त्या साहाय्याने काचेच्या वस्तू स्वच्छ करा किंवा काचेच्या बाटलीत लिक्विड टाकूनही तुम्ही ते स्वच्छ करू शकता. फक्त नंतर बाटली स्वच्छ धुवून घ्या.

चिंच – काचेवरील डाग काढून टाकण्यासाठी चिंच उत्तम पर्याय आहे. चिंचमध्ये असणाऱ्या आम्लीय गुणधर्मामुळे काचेवरील डाग काही वेळात दूर होतात. यासाठी सध्या पाण्यात चिंच भिजत ठेवा आणि आता तयार पाण्याने काचा स्वच्छ करा.

नेलपॉलिश रिमूव्हर – नेलपॉलिश रिमूव्हर कोणत्याही प्रकारचे डाग सहजपणे काढून टाकू शकते. त्यामुळे काचेच्या फर्निचरवरील डाग काढण्यासाठी तुम्ही नेलपॉलिश रिमूव्हरचा वापर करू शकता.

 

 

 


हेही वाचा : घरात कपड्यांचे ढिगारे जमलेत, मग असं करा वॉर्डरोब सेट

 

- Advertisment -

Manini