घरदेश-विदेशED : पंतप्रधान मोदींचा नवा विचार; ईडीने जप्त केलेला पैसा सामान्यांना कसा...

ED : पंतप्रधान मोदींचा नवा विचार; ईडीने जप्त केलेला पैसा सामान्यांना कसा परत करता येणार?

Subscribe

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या विरोधात भाजपा उमेदवार अमृता रॉय यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरध्वनी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदींना त्यांना म्हटले की, पश्चिम बंगालमधील गरिबांकडून लुटलेला आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केलेला पैसा लोकांना परत मिळावा यासाठी ते काम करत आहेत. पश्चिम बंगालच्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी मोदींनी असं वक्तव्य केल्याचे स्पष्ट केले आहे. (Prime Minister Modis New Thought How can the money seized by ED be returned to the common man)

हेही वाचा – Congress : काँग्रेस पुन्हा अडचणीत; 135 कोटींनंतर प्राप्तिकर विभाग 524 कोटी वसूल करण्याची शक्यता

- Advertisement -

राजमाता अमृता रॉय यांच्याशी फोनवरून संवाद साधताना मोदी म्हणाले की, ईडीने पश्चिम बंगालमधील 3000 कोटी रुपये जप्त केले आहेत. हा गरीबांचा पैसा आहे. कोणी शिक्षक बनण्यासाठी पैसे दिले, तर कोणी लिपिक बनण्यासाठी पैसे दिले. त्यामुळे गरीबांचे पैसे त्यांना परत करण्यासाठी मी कायदेशीर सल्ला घेत आहे. माझी इच्छा आहे की नवीन सरकार स्थापन होताच कायदेशीर तरतुदी करून नवीन नियम बनवला जाईल.

मोदींनी अमृता रॉय यांना सांगितले की, मला गरिबांचे 3 हजार कोटी रुपये परत करायचे आहेत. जे त्यांनी लाच म्हणून दिले आहेत. त्यामुळे तुम्ही जनतेला सांगा की, मी मोदींशी बोलले आहे. पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपावर विश्वास ठेवावा. ईडीने जप्त केलेले 3 हजार कोटी रुपये परत करण्यासाठी मी काही ना काही मार्ग शोधत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : आंबेडकरांच्या एकला चलो रे भूमिकेवर संजय राऊत म्हणतात, …संविधानाचे दुर्दैव

भाजपा नेत्यांनी काय म्हटले?

दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि अमृता रॉय यांच्यात फोनवरून झालेल्या संभाषणावर बोलताना पश्चिम बंगालच्या भाजपा नेत्यांनी सांगितले की, मोदींचा अंदाज आहे की राज्यात नोकरी मिळवण्यासाठी लाच म्हणून दिलेली रक्कम अंदाजे 3 हजार कोटी रुपये आहे. त्यामुळे मोदींनी अमृता रॉय यांना सांगितले आहे की, त्यांनी लोकांना याबद्दल सांगावे आणि सत्तेत आल्यानंतर लगेचच जनतेचा पैसा त्यांना परत करण्यासाठी मार्ग काढण्यात येईल. याशिवाय गरज भासल्यास कायदेशीर पर्यायही शोधले जातील, असे मोदींनी अमृता रॉय यांना सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -