घरक्रीडाShubman Gill : चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर गिलला धक्का; या कारणाने ठोठावला दंड

Shubman Gill : चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर गिलला धक्का; या कारणाने ठोठावला दंड

Subscribe

नवी दिल्ली : आयपीएलच्या 17 व्या हंगामात पहिल्यांदाच गुजरातचे कर्णधार भूषवत असलेल्या भारताचा स्टार खेळाडू शुबमन गिलने मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिला सामना जिंकला, मात्र दुसऱ्या सामन्यात गुजरात संघाला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. गुजरात संघाने 63 धावांनी सामना हरला. त्यामुळे आधीच पराभवाचा धक्का बसलेल्या शुबमन गिलला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. (Shubman Gill shocked after defeat against Chennai Penalty imposed for this reason)

हेही वाचा – PL 2024: धोनी शेर तर रहाणे सवा शेर…; अजिंक्यनेही बिबट्याच्या चपळाईने घेतला कॅच; व्हिडीओ व्हायरल

- Advertisement -

 शुबमन गिल चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला आहे. गुजरात संघ मंगळवारी चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर निर्धारित वेळेत आपली षटके टाकू शकला नाही. त्यामुळे शुबमन गिलला दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलने सांगितले की, आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत गुजरात संघाचा हा सीझनमधील पहिला गुन्हा आहे. त्यामुळे गिलला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेत निर्धारित 20 षटकांत 206 धावा केल्या. चेन्नईच्या फलंदाजांकडून सातत्याने धावा होत असल्याने शुबमन गिलला रणनीती बनवण्यासाठी आणि गोलंदाज बदलण्यासाठी थोडा जास्त वेळ लागला. त्यामुळे गुजरात संघ स्लो ओव्हर रेटसाठी दोषी ठरला. चेन्नई सुपर किंग्जच्या डावाच्या शेवटच्या षटकात गुजरात संघाला 30 यार्डच्या बाहेर फक्त 4 खेळाडूंनाच ठेवता आले होते.

- Advertisement -

हेही वाचा – ED : पंतप्रधान मोदींचा नवा विचार; ईडीने जप्त केलेला पैसा सामान्यांना कसा परत करता येणार?

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जकडून मिळालेल्या धावांचा पाठलाग करताना शुबमन गिलला मोठी खेळी करता आली नाही आणि बाकीचे फलंदाजही अपयशी ठरले. गुजरात संघ निर्धारीत 20 षटकात 8 विकेट्स गमावत केवळ 143 धावांपर्यंत मजल मारू शकला आणि संघाला 63 धावांनी दारूण पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या पराभवामुळे गुजरात संघाला आणखी एक धक्का बसला आहे. गुजरात संघ गुणतालिकेत थेट सहाव्या स्थानावर घसरला आहे. गुजरात संघाचा पुढील सामना 31 मार्च रोजी अहमदाबाद येथील त्यांच्या घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजता खेळवला जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -