घरपालघरWorker Dies: टाकी साफ करताना कामगाराचा मृत्यू

Worker Dies: टाकी साफ करताना कामगाराचा मृत्यू

Subscribe

ही घटना समजताच तिरुपतीला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते.

वसईः विरार येथील खासगी सांडपाणी प्रकल्पाची सफाई करताना चार सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी दुपारी वसईतील चिंचपाडा येथे सांडपाण्याची टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला. तिरुपती भुट्टे (३३) असे त्याचे नाव आहे. वसई पूर्वेकडील चिंचपाडा येथील एव्हरशाईन इंडस्ट्रीजची सांडपाण्याची टाकी साफ करण्यासाठी तिरुपती भुट्टे टाकीत उतरला होता. कुठल्याही प्रकारची सुरक्षेच्या साधनाशिवायच टाकी साफ करण्यासाठी तिरुपतीला टाकीत उतरवण्यात आले होते. टाकी साफ करताना विषारी वायुमुळे श्वास गुदमरून तिरुपती टाकीतच बेशुध्द पडला.

ही घटना समजताच तिरुपतीला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. पण, त्याची प्रकृत्ती खालावल्याने त्याला महापालिकेच्या सर डि. एम. पेटीट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, ९ एप्रिलला दुपारी ग्लोबल सिटी येथील खासगी सांडपाणी प्रकल्पात सफाई करत असताना चार सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच सोमवारी आणखी एका कामगाराचा टाकी साफ करत असताना मृत्यू झाल्याने सफाई कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -