घरपालघरकंक्राडी नदी स्वच्छतेला अखेर सुरुवात

कंक्राडी नदी स्वच्छतेला अखेर सुरुवात

Subscribe

त्यानुसार गेल्या आठ ते दहा दिवसापासून डहाणू नगर परिषदेने काम हाती घेऊन या नदी पात्राची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे.

डहाणू : डहाणू शहरालगत असलेल्या प्रसिद्ध कंक्राडी नदी ते डहाणू शहर येथून बस आगार लगतच्या खाजनातून डहाणू खाडी मार्गे अरबी समुद्राला मिळते. पावसाळ्यात तर या नदी पात्राचे पाणी पातळी वाढून डहाणू शहर हे अर्धे जलमय होते. पाणी रस्त्यावर येऊन यामध्ये डहाणूतील व्यापारी वर्गांचे दुकानात पाणी शिरून मोठे नुकसान होते. जवळच असणार्‍या डहाणू बस स्थानकात पाणी शिरून नुकसान होते. तसेच या नदी पात्रात शहरातील घाण पाणी सोडले जाते. त्यामुळे नदीतून दुर्गंधी, व पाणी दूषित होऊन मनविजिवणाला धोका निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच अन्य पशू व प्राणी यांना पाणी पिण्याने विषबाधा होऊ शकते. या दृष्टीने व शहर सुरक्षा दृष्टीने या गंभीर बाबींकडे पावसाळा येण्याआधीच डहाणू नगर परिषदेने विशेष लक्ष घालून आताच या नदीतील प्रदूषण हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. त्याचबरोबर कंक्राडी नदीवरील असणार्‍या धरणांची देखील दुरावस्था झाली असून दुरुस्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. येथील धरणातील राडारोडा काढून अन्य विकास कामात याचा वापर केला पाहिजे .या धरणाची तसेच नदीपात्राची स्वच्छता ठेवल्यास या पाण्याचा वापर होऊन जलसाठे कार्यरत होतील तसेच जवळच असणार्‍या शेती बागायतदारांना देखील याचा वापर करता येईल, असे सोसायटी फॉर फास्ट जस्टीस या संस्थेतर्फे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार गेल्या आठ ते दहा दिवसापासून डहाणू नगर परिषदेने काम हाती घेऊन या नदी पात्राची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे.

 

- Advertisement -

कंक्राडी नदी पात्राची स्वच्छता करणे सुरू असून नागरिकांनी देखील स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अधिकचे मनुष्य बळ व पोकलेन मशीन लावून स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून पावसाळ्यात पुर परिस्थिती निर्माण होणार नाही व सुरक्षा दृष्टीने विशेष लक्ष दिले आहे.
– वैभव आवारे. प्रशासक नगरपरिषद डहाणू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -