Thursday, April 18, 2024
घरमानिनीKitchenReceipe : चविष्ट मूग-पनीर चीला

Receipe : चविष्ट मूग-पनीर चीला

Subscribe

आपल्या दैनंदिन चविष्ट आहारासोबतच पौष्टिक आहार देखील महत्वाचा असतो. अशावेळी वारंवार आहारात नवनवीन पदार्थांचा सहभाग करा.

साहित्य :

 • 1/2 कप हिरवी मूग डाळ
 • 4 पाकळ्या लसूण
 • 1/2 कप पनीर
 • 2 हिरव्या मिरच्या
 • चवीनुसार मीठ
 • कोथिंबीर
 • तेल

कृती :

Moong Dal Cheela Recipe With Stuffed Paneer by Archana's Kitchen

 • सर्वप्रथम मूग-पनीर चीला बनवण्यासाठी हिरवी मूग डाळ 5-6 तास भिजत ठेवा.
 • 5-6 तासानंतर भिजवलेली मूग, अर्धा कप पाणी, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि मीठ ग्राइंडरच्या भांड्यात बारीक करून घ्या.
 • हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या.
 • आता पनीर चांगले किसून घ्या आणि त्यात हिरवे धने, हिरवी मिरची चिरून टाका.
 • एका भांड्यात किसलेले पनीर, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ एकत्र करून सारण तयार करा.
 • आता मध्यम आचेवर तवा तापत ठेवा आणि त्यात थोडे तेल टाका.
 • तापलेल्या तव्यावर मूग चीला पसरवा आणि हा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.
 • त्यानंतर हा चीला एका भांड्यात काढा आणि त्यात तयार केलेले सारण पसरवून त्याचा गोल रोल करा.
 • चविष्ट मूग पनीर चीला सॉस सोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

- Advertisment -

Manini