Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenBanana Samosa : मुलांसाठी बनवा केळ्याचे Yummy समोसे

Banana Samosa : मुलांसाठी बनवा केळ्याचे Yummy समोसे

Subscribe

आतापर्यंत आपण मैद्याचे आणि पनीर समोसे खाल्ले आहेत. परंतु आज आम्ही तुम्हाला केळीचे समोसे कसे बनवायचे ते सांगणार आहोत.

साहित्य :

  • 1 कप मैदा
  • 2-3 उकडून मॅश केलेली कच्ची केळी
  • 1 चमचा ओवा
  • 5 चमचे गोड तेल
  • 1 चमचा जिरं पूड
  • 1 चमचा आमसूल पूड
  • 1 चमचा धणेपूड
  • आलं-लसूण पेस्ट
  • कोथिंबीर
  • हळद
  • तिखट
  • मीठ
  • तळण्यासाठी तेल

कृती :

सर्वप्रथम मैद्यामध्ये गोड तेल, ओवा, मीठ, घालून हवे तेवढे पाणी घालून घट्ट मळून घ्या. त्यानंतर त्या गोळ्याला 15-20 मिनिटे झाकून ठेवा.

- Advertisement -

सारणासाठी कृती

कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जीरपूड, आलं लसूण पेस्ट, आमसूल पूड, मॅश केलेले केळी, हळद, तिखट, मीठ घालून चांगले परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

समोसे बनवण्याची कृती

Punjabi Samosa - Manjula's Kitchen - Indian Vegetarian Recipes

  • सर्वप्रथम भिजवलेल्या गोळ्याचे बारीक गोळे करून घ्या पोळी लाटायची. पारी जास्त जाड किंवा बारीक नसावी.
  • आता त्या पोळीचे मधून काप करावे. त्या कापाच्या वरील टोकाला पाणी लावून त्याला खालचे टोक जोडावे.
  • आता त्याला त्रिकोणाकार आकार द्यावा आणि त्यामध्ये सारण भरावे आणि पुन्हा सर्व बाजूच्या कड्यांना पाणी लावून चिकटवून घ्यावे.
  • आता समोसे कढईत तेल गरम करून मध्य आचेवर तांबूस रंग येईपर्यंत तळावे.
  • तयार समोसे पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करावे.

हेही वाचा :

Idli : झटपट बनवा हेल्दी रवा-बेसन इडली

- Advertisment -

Manini