Saturday, April 27, 2024
घरमानिनीKitchenReceipe : टेस्टी मूग डाळ कचोरी

Receipe : टेस्टी मूग डाळ कचोरी

Subscribe

अनेकांना तिखट किंवा गोड कचोरी खाण्यास आवडते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मूग डाळ कचोरी रेसिपी दाखवणार आहोत.

साहित्य :

सारण करण्यासाठी

- Advertisement -
  • 1/2 कप मूग डाळ
  • 1/2 चमचा तूप
  • 1/4 चमचा हळद
  • 1/2 चमचा लालतिखट
  • 1/2 चमचा जिरेपूड
  • 1/2 चमचा सुंठ पावडर
  • 1 चमचा धणेपूड
  • 1 चमचा बडीशेपपूड
  • 1 चमचा आमचूर पावडर
  • चवीनुसार मीठ

आवरण

  • 2 कप मैदा
  • 1/2 कप पाणी
  • तूप किंवा तेल
  • मीठ
  • तेल तळण्यासाठी

कृती :

Kachori Wikipedia, 46% OFF | www.stanleymilton.com

- Advertisement -
  • सर्वप्रथम एका बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये तूप आणि चवीनुसार मीठ घालावे. पीठ मळून घ्यावे. त्यानंतर, थोडे पाणी मिसळून पुन्हा पीठ मळून घ्यावे.
  • पीठ फार घट्ट किंवा फार मऊ मळू नये. आता हे पीठ ओलसर कापडाखाली झाकून ठेवावे.
  • त्यांनतर, कचोरीच्या आतील सारणाची तयारी करण्यास घ्यावी.
  • दोन तास भिजवलेली मूगडाळ मिक्सरमध्ये बारीक करा. आता, गरम पॅनमध्ये तूप घालून ते छान तापल्यावर त्यामध्ये हळद, लाल तिखट, जिरेपूड, धणेपूड, बडीशेप पूड, आमचूर पावडर घालून सर्व छान परतून घ्यावीत.
  • त्यानंतर त्यामध्ये वाटलेली मूग डाळ, मीठ आणि थोडा हिंग घालून पुन्हा एकदा सर्व मिश्रण मंद आचेवर परतून घ्यावा.
  • तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे करावेत आणि ओलसर कपड्याखाली झाकून ठेवलेल्या मिश्रणाची हातानाचे लहान पुरी तयार करुन त्यामध्ये सारणची गोळी भरावी. आवरण नीट बंद करावे आणि हाताने हलकेच दाबावे.
  • अशाप्रकारे, तयार झालेल्या कचोरी गरमागरम तेलात खुसखुशीत तळून घ्यावेत आणि चटणीसोबत सर्व्ह कराव्यात.

हेही वाचा :

Receipe : चटपटीत मसाला भेळ

- Advertisment -

Manini