Wednesday, May 15, 2024
घरमानिनीHealthअंड्यासोबत 'हे' पदार्थ खाणं मानलं जातं घातक

अंड्यासोबत ‘हे’ पदार्थ खाणं मानलं जातं घातक

Subscribe

शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी अंडी किती फायदेशीर आहेत हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. अंड्यात शरीरासाठी आवश्यक असलेले प्रोटीन्स असल्याने डॉक्टरही अंडी खाण्याचा सल्ला देतात. अंडयामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि अमिनो अँसिड असतात. यामुळे शरीराला दिवसभर कार्य करण्यासाठी मुबलक प्रमाणात ऊर्जा मिळते. दिवसाच्या सुरुवातीला सकाळी नाश्तामध्ये दोन उकडलेली अंडी खाणे हे कधीही योग्य ठरते. परंतु काहीजण अंड्यासोबत असे काही पदार्थ खातात जे शरीरासाठी घातक मानले जातात.

अंड्यासोबत खाऊ नका ‘हे’ पदार्थ

  • अंड्यासोबत केळी

8 Effective Egg Substitutes for Baking and Cookingसुदृढ राहण्यासाठी दररोज केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये फायबरसह अनेक पोषक घटक असतात. त्याचप्रमाणे अंडी हे देखील एक सुपरफूड आहे परंतु ते दोन्ही एकत्र कधीही खाऊ नये. या दोन्ही गोष्टी खाव्या लागल्या तरी त्यामध्ये किमान 2 तासांचे अंतर ठेवावे

- Advertisement -
  • अंड्यासोबत चहा किंवा कॉफी

Primal Egg Coffee

 

- Advertisement -

अनेकजण सकाळचा नाश्ता करताना अंड्यासोबतच चहा किंवा कॉफी पितात. जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे तुम्हाला पोटदुखी आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.

  • अंड्यासोबत गोड पदार्थ

Indian Desserts: 28 sweet dishes from 28 States | Veena World

अंड्यासोबत मिठाई किंवा जास्त साखरेपासून तयार केलेले पदार्थ खाणे घातक आहे. अशावेळी अंडी खाल्ल्यानंतर किमान एक तासाने काहीही गोड खा परंतु लगेच अंड्यासोबत गोड खाणे टाळा.


हेही वाचा :

चहा-बिस्किटमुळे वाढेल हृदयासंबंधित आजार

- Advertisment -

Manini