घरमहाराष्ट्रशर्मिला ठाकरेंच्या भेटीनंतर तृप्ती देवरुखकर-एकबोटेंची प्रतिक्रिया;  म्हणाल्या...

शर्मिला ठाकरेंच्या भेटीनंतर तृप्ती देवरुखकर-एकबोटेंची प्रतिक्रिया;  म्हणाल्या…

Subscribe

मुंबई : ‘घर मालकाची चूक नाही, सेक्रेटरीचा दोष होता’, अशी प्रतिक्रिया गुजराती-मराठी प्रकरणातील महिला तृप्ती देवरुखकर-एकबोटे यांनी दिली आहे. या प्रकरणानंतर तृप्ती देवरुखकर-एकबोटेंनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली.

तुम्हाला जी जागा अपेक्षित होती, ती मिळाली का?, या प्रश्नावर तृप्ती देवरुखकर एकबोटे म्हणाल्या, “त्या इमारतील लोक जागा देण्यासाठी तयार होते. जी जागा ज्या व्यक्तींची जागा बघण्यासाठी गेले होते. ते ती जागा देण्यासाठी तयार होते. हा संपूर्ण प्रकार त्यांच्या सेक्रेटरी केला होता. या प्रकारानंतर मी त्या मालकाला कॉल करून सर्व सांगितल्यानंतर तेव्हा त्यांना सुद्धा राग आला होता. या प्रकरणी आम्ही इमारतीच्या कमिटीकडे बोलतो, असा कोणताही नियम कोणी लावू शकत नाही. या प्रकारानंतर इमारतीच्या कमिटीच्या सदस्यांनी त्यांनी सेक्रेटरी पदावरून टाडून टाकले आहे. त्या इमारतीमधील सदस्या हे गुजराती आहेत. पण त्यांना मला ती जागा देण्यास काही समस्या नव्हती.” तृप्ती देवरुखकर एकबोटे पुढे म्हणाल्या, “ती जागा माझ्या वापरासाठी खूप छोटी आहे. पण ती जागा बघून आम्ही बाहेर आलो. यावेळी पिता-पुत्रांनी आम्हाला ही जागा भाड्यांनी घेणार, राहण्यास येणार, व्यावसायासाठी घेणार, असे न विचारता फक्त मी मराठी आहे. म्हणून त्यांना आम्हाला विरोध करण्यास सुरुवात केली की, येथे मराठी लोकांना परवानगी नाही.”

- Advertisement -

हेही वाचा – ‘जर पुन्हा असं घडलं तर गालावर…’ मराठी महिलेला घर नाकारल्याप्रकरणी राज यांचा ‘ठाकरे’ शैलीत समाचार

शर्मिला ठाकरेंच्या भेटीनंतर तृप्ती देवरुखकर-एकबोटे म्हणाल्या, “परवा मुलुंडमध्ये जो प्रकार झाला. मी कोणाकडेही मदत मागण्यास केली नाही. मी तो व्हिडीओ रागात गेला. कारण मला माझ्या भावना पोहोचवायच्या होत्या. तो व्हिडीओ मी फेसबुकवर टाकला आणि त्यानंतर तो व्हायरल झाला. यानंतर सर्वात पहिले मला मनसेकडून प्रतिसाद मिळाला. मग मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मला संपर्क साधला आणि त्या ठिकाणी माझ्यासोबत आले. मग मसनेच्या पदाधिकाऱ्यांना त्या पती-पुत्रांना जाब विचारला होता. त्या पती-पुत्रांनी मराठीतून माझी माफी मागण्याची अपेक्षा होती. त्यांनी ती माफी व्हिडीओत घेतली होती. मला शर्मिला ठाकरेंचे आभार मानायचे होते की, मनसे सर्वप्रमथम आमच्या मदतीसाठी धावून आले होते. यानंतर सर्व राजकीय पक्षांनी मदततीला आल्या. यानंतर आम्ही पोलिसांत तक्रार केली. पण मनसे ही प्रथम आमच्या मदतीला धावून आले. आज शिर्मीला वहिनी अभिनंदन केले की, तू खूप खंबीरपणे पुढे आली. यासंबंधात मुंबईमध्ये अनेक लोकांसोबत असे प्रकार होत आहेत. पण कोणी समोर येऊन बोलत नाही. पण मी समोर येऊन बोलते. हे सर्व व्हायरल झाले आणि आता लोक असे म्हणतात की, आमच्यासोबत हे होत आहे. माझ्यासोबत जी घटना घडली, आणि हे व्हायरल झाले. यानंतर लोक पुढे येऊन बोलतील.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -