आपण यापूर्वी कोथिंबीर वडी, आळू वडी असे अनेक वड्याचे प्रकार आपण पाहिले आहेत. आज आपण झटपट पालक वडी कशी तयार करतात हे पाहणार आहोत.
साहित्य :
- पालक
- लसूण
- हिरवी मिरची
- जिरे
- ओवा
- ज्वारीच पीठ
- बेसन
- हळद
- तीळ
- मीठ
कृती :
- सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून त्याचे देठ काढून फक्त पानं घ्यावी, मग पाच ते सहा पानं वेगळी एकमेकांवर ठेवून त्याचा रोल करून कापून घ्यावी. अशा प्रकारे सर्व पानं कापून घ्यावी.
- त्यानंतर मसाला करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 7-8 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या, एक चमचा जिरे आणि ओवा टाकायचा आणि हे मिश्रण व्यवस्थित वाटून घ्यायचं.
- आता कापलेल्या पालकामध्ये ज्वारीच पीठ घालायचं. त्यात 2-3 चमचे बेसन, एक चमचा हळद, थोडे पांढरे तीळ, चवीनुसार मीठ आणि मिक्सरवर वाटलेला बारीक मसाला त्यामध्ये घालायचा.
- हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
- मग त्यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून ते व्यवस्थित मळून घ्यायचं आणि त्यानंतर पीठ एका भांड्यात ठेवून नीट थापायचे.
- कूकरमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये स्टँट ठेवून मिश्रण असलेलं भांडं त्यावर ठेवायचं.
- मग कुकरची शिटी काढून तो 15 ते 20 मिनिटं मंद आचेवर स्टिम करण्यासाठी ठेवावे.
- स्टिम करून झाल्यानंतर त्याच्या चौकानी वड्या कापून त्या तेलून घ्याव्या.
- तयार पालक वडी सर्व्ह करा.
- Advertisement -
हेही वाचा : Recipe : घरी करा ढाबा style मिक्स दाल तडका,जाणून घ्या साहित्य आणि कृती
- Advertisement -
- Advertisement -