लोणचं म्हटलं की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. प्रत्येक घरात किमान 2-3 तरी व्यक्ती आवडीने लोणचं खातात. पण तुम्ही जर प्रमाणापेक्षा जास्त लोणच्याचे सेवन करत असाल तर सावध व्हा! कारण जास्त लोणच खाण्याची सवय तुम्हाला आजारी पाडू शकते. लोणच्याचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी त्यात मोठ्या प्रमाणात मीठ आणि तेल टाकले जाते. यामुळे उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि हाडे ढिसूळ होऊ शकतात.
अनेकदा आपण जेवणाची चव वाढवण्यासाठी लोणच्याचा तुकडा ताटात वाढतो. लोणचे खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदा होतो. पण जर याच लोणच्याचे तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त सेवन केले तर यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.
जास्त प्रमाणात लोणचं खाणं आरोग्यासाठी घातक
- लोणचे बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या प्रक्रियेमुळे त्याचे पौष्टिक मूल्य कमी होते.
- तसेच हे लोणचे बनवण्यासाठी फळे किंवा भाज्या कापून उन्हात वाळवण्यासाठी ठेवल्या जातात.
- फळे किंवा भाज्यांमध्ये पाणी राहू दिले जात नाही. तसेच सूर्यप्रकाशात फळे कोरडी केल्यामुळे बहुतेक पोषक तत्वांचा नाश होतो.
- लोणची वाळवण्यासाठी त्याच्या प्रक्रियेत त्यांच्यावर मीठाचा लेप लावला जातो.
- लोणच्यात असलेल्या सोडियममुळे रक्तदाब वाढतो.
- लोणचे किंवा लोणच्यासारख्या इतर अनेक खारट पदार्थांमध्ये असलेले सोडियम यामुळे रक्तदाब वाढतो.
- अतिरिक्त सोडियम क्लोराईड खाण्याच्या नियमित सवयीमुळे उच्च रक्तदाब आणि इतर अनेक आजार देखील होऊ शकतात.
- त्यामुळे लोणच्याचे सेवन कमी प्रमाणातच चवीपुरते करावे.
हेही वाचा :