घरदेश-विदेशPM Modi : 370 कलम हटवून काय केलेत? ठाकरे गटाचा मोदी सरकारला...

PM Modi : 370 कलम हटवून काय केलेत? ठाकरे गटाचा मोदी सरकारला प्रश्न

Subscribe

हजारो काश्मिरी पंडित आजही निर्वासितांच्या छावण्यांत राहतात आणि 370 कलम हटवून भारतीय संविधान लागू केल्याचा फायदा पंडितांना होऊ शकलेला नाही. मग कोणत्या भारतीय संविधानाची भाषा पंतप्रधान मोदी प्रचार सभांतून करीत आहेत? असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला आहे.

मुंबई : काश्मीर खोऱ्यातून 370 कलम हटविण्याचा पराक्रम मोदी सरकारने केला आणि त्याबद्दल त्यांचे कौतुकच व्हायला हवे, पण 370 कलम हटवले तरी तेथे भारताचे संविधान खरोखर लागू झाले आहे काय? हा प्रश्नच आहे. काश्मिरात आजही सैनिकी राज्य आहे. पाच वर्षांपासून तेथे विधानसभेच्या निवडणुका नाहीत. मग 370 कलम हटवून काय केलेत? असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदी सरकारला केला आहे. (Article 370 : Thackeray group’s criticism of Modi government regarding Jammu and Kashmir)

काश्मिरात लोकांना रोजगार नाही, सुरक्षा नाही. भारतीय संविधान लागू झाल्यावर नोकऱ्या उपलब्ध होतील, असे ‘मोदी वचन’ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिले होते त्याचे काय झाले? काश्मीरचाच भाग असलेल्या लडाखमध्ये चिनी सैन्य थेट आपल्या हद्दीत घुसले आहे, असे सोनम वांगचुक यांनी उघड केले. लडाखमध्ये अशांतता असून तेथील जनता रस्त्यावर उतरली आहे आणि भारतीय संविधान काश्मीर खोऱ्यात खतऱ्यात आले आहे, असा दावा सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे.

- Advertisement -

मणिपुरातून संविधान पूर्णपणे उखडले गेले (The constitution was completely uprooted from Manipur)

हजारो काश्मिरी पंडित आजही निर्वासितांच्या छावण्यांत राहतात आणि 370 कलम हटवून भारतीय संविधान लागू केल्याचा फायदा पंडितांना होऊ शकलेला नाही. मग कोणत्या भारतीय संविधानाची भाषा पंतप्रधान मोदी प्रचार सभांतून करीत आहेत? मणिपुरातून भारतीय संविधान पूर्णपणे उखडले गेले आहे आणि संविधानाच्या रक्षणासाठी मणिपुरात जाण्याचे धैर्य मोदी दाखवू शकले नाहीत. त्यामुळे भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे संविधान मोदी यांच्या नावाने अश्रूच ढाळत असेल, अशी बोचरी टीका ठाकरे गटाने केली आहे.

मोदींकडून भ्रष्टाचाऱ्यांना अभय (Support of corrupt persons by Modi)

पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील सर्व भ्रष्टाचारी, व्यभिचारी भाजपात घेतले. त्यातल्या अनेक बड्या भ्रष्टाचाऱ्यांवर स्वतः मोदी यांनी प्रहार केले होते. भाजपात या सगळ्यांना प्रवेश देऊन मोदी यांनी त्या सगळ्यांना तुरुंगात जाण्यापासून वाचवले आहे. अजित पवार वगैरे लोकांना तर तुरुंगात चक्की पिसायला पाठवायचा निर्णय विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. ते पवार आज फडणवीस यांच्या टेबलावर बसून सत्तेचे पत्ते पिसत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक भ्रष्टाचारी भाजपात आहे आणि मोदी त्या सगळ्यांना अभय देत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना कोण वाचवत आहे, हेदेखील उघड आहे, असा प्रहार ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -