घरमुंबईKhichdi Scam : खिचडी घोटाळ्यात काहीही हाती लागणार नाही; गजानन कीर्तिकरांनी घेतली...

Khichdi Scam : खिचडी घोटाळ्यात काहीही हाती लागणार नाही; गजानन कीर्तिकरांनी घेतली मुलाची बाजू!

Subscribe

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अमोल किर्तीकर यांना मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र चार दिवसांपूर्वीच त्यांची खिचडी घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आठ तास चौकशी केली आहे. तसेच त्यांना याआधी दोनदा समन्स बजावण्यात आले आहे. मात्र कथित खिचडी घोटाळ्यात काहीही हाती लागणार नाही, असे वक्तव्य त्यांचे वडील आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले आहे. अमोल कीर्तिकर यांची ईडीमार्फत सुरू असलेल्या चौकशीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली असून माझ्या मुलाच्या विरोधात मी प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. (Alleged khichdi scam will lead to nothing Gajanan Kirtikar sided with Amol Kirtikar)

गजानन कीर्तिकर म्हणाले की, कथित खिचडी घोटाळ्यात काहीही हाती लागणार नाही. हे ईडीचे अधिकारीसुद्धा खासगीत कबूल करत आहेत. कोरोना काळात अनेक जम्बो उपचार केंद्र सुरू करताना वैद्याकीय साहित्य पुरवठा करावा लागला होता. त्यात रुग्णांसाठी खिचडी पुरवठ्याचाही समावेश होता. संजय माशेलकर यांनी हा पुरवठा करण्यासाठी एक कंपनी स्थापन केली. या कंपनीसाठी पुरवठा करण्याचे काम अमोल कीर्तिकर यांनी केले. त्यात जो काही नफा झाला त्याचा मोबदला सर्वांना धनादेशाद्वारे देण्यात आला. इतकंच नाहीतर त्यावर प्राप्तिकरही भरण्यात आला आहे. त्यामुळे घोटाळा वगैरे काही झालेलं नाही, असे म्हणत गजानन कीर्तिकर यांना एकप्रकारे मुलाची बाजू घेतली आहे.

- Advertisement -

 हेही वाचा – Eknath Shinde : मुख्यमंत्री अडचणीत; इतिहासाची मोडतोड प्रकरणी कायदेशीर नोटीस

खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल कीर्तिकरांची 8 तास चौकशी

दरम्यान, ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी घोषित करताच त्याचदिवशी त्यांना ईडीने खिचडी घोटाळ्याप्रकरणी समन्स पाठविले होते. ईडीने दोनदा समन्स बजावल्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी वेळ मागितली होती. त्यानुसार 8 एप्रिल रोजी ते सकाळी 11 वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांची 8 तास चौकशी झाली. खिचडी घोटाळ्याप्रकरणी 1 सप्टेंबर 2023 रोजी फसवणूक, फौजदारी विश्वासघात, कट रचणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 6.37 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून याच गुन्ह्याच्या आधारावर ईडी तपास करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : नकली शिवसेना.. नकली राष्ट्रवादी, अमित शहांच्या टीकेवर जयंत पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -