घरमहाराष्ट्रव्ही. पी. बेडेकर आणि सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन

व्ही. पी. बेडेकर आणि सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन

Subscribe

मुंबई : देशभरात लोणचे आणि मसाल्यासाठी ओळखले जाणाऱ्या व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल वसंत बेडेकर यांचे निधन झाले आहे. अतुल बेडेकर वयाच्या 56 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अतुल बेडेकर हे दीर्घ काळापासून आजारी होते. अतुल बेडेकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहे.

अतुल बेडेकरांनी लोणची, मसाले आणि चटणी या पारंपारिक मराठी खाद्यपदार्थ व्यवसायातील एक प्रतिष्ठित नाव आहे. 1910 मध्ये विश्वनाथ पर्शराम बेडेकर यांनी गिरगावात लहानसे किराणामालाचे दुकान सुरू केले. यात विश्वनाथ बेडेकरांनी लोणची आणि मसाले ठेवण्यास सुरुवात केली होती. यानंतर लोणची आणि मसाले यांचा खप मोठ्या प्रमाणात होऊ लागला होता. यानंतर विश्वनाथ बेडेकरांनी त्यांच्या दुकानांच्या शाखा काढण्यास सुरुवात केली. यानंतर दादर, फोर्ट, माणकेश्वर मंदिराजवळ बेडेकरांनी पाच दुकाने सुरू केली. यानंतर बेडेकरांचा वाढता उद्योग पाहात त्यांनी 1943 मध्ये व्ही. पी. बेडेकर आणि सन्स लिमिटेड असे कंपनीचे नामकरण करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची गरज; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

परदेशापर्यंत बेडेकर लोणची आणि मसाले पोहोचवले. 1960 पी. पी. लीक प्रूफ कॅप्स भारतात प्रथम बेडेकरांनी वापरण्यास सुरुवात केली. यामुळे लोणच्या निर्णाय होऊ लागले. बेडेकरांच्या कर्जतच्या फॅक्टरीत जवळपास 600 टन लोणचे सीझनमध्ये तयार होते. बेडेकरांचे लोणचे देशातील महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश विक्री होते. तसेच परदेशातील कॅनडा, अमेरिका, मध्य पूर्व, युरोप आणि ऑस्ट्रेलिया देशात बेडेकरांची लोणचे आणि मसाले निर्यात होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -