घरपालघरलोणच्यालाही बसतेय महागाईची फोडणी

लोणच्यालाही बसतेय महागाईची फोडणी

Subscribe

तसेच लोणच्याची कैरी फोडून देण्यासाठी विक्रेत्याकडून वेगळे पैसे आकारले जात आहेत. लोणच्यासाठी कैरी फोडून देण्यासाठी २० ते ३० रुपये प्रति किलो घेतले जातात.

जव्हार: जव्हार शहर आणि ग्रामीण भागात जेवताना लोणचे हे असतेच. परंतु वाढत्या महागाईच्या झळा कैरी सहित मसाल्याच्या दरांना सुध्दा लागल्याने लोणचे अधिक आंबट झाल्याचे गृहिणी बोलत आहेत. लज्जतदार जेवणाला लोणच्याने आणखी चव येते. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात लोणचे बनविण्यासाठी महिलांची लगबग सुरू असते. मात्र, यंदा वाढत्या महागाईचा फटका लोणच्याला पण बसला आहे. आंब्याची आवक वाढली असल्याने आंब्याच्या भावात घसरण झाली असली, तरी कैरी मात्र अजूनही तेजीत आहे. दर्जानुसार कैरी प्रति किलो ५० ते ७० रुपये इतका भाव आहे. तसेच लोणच्याची कैरी फोडून देण्यासाठी विक्रेत्याकडून वेगळे पैसे आकारले जात आहेत. लोणच्यासाठी कैरी फोडून देण्यासाठी २० ते ३० रुपये प्रति किलो घेतले जातात.

आजच्या काळात विकतचे लोणचे मिळत असले तरी महिलावर्गाचा घरगुती पद्धतीने लोणचे बनविण्याकडे कल असतो; मात्र यंदा सर्व साहित्य महागल्याने लोणचे तयार करायची की नाही, असा प्रश्न महिला वर्गात निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांत आंब्याची आवक वाढल्याने भाव कमी झाले असले तरी काही कैरीला मात्र अधिक भाव असल्याचे चित्र आहे. मान्सून दाखल झाल्यानंतर पडत असल्याने मान्सूनच्या आगमनाच्या आधी लोणचे तयार करण्यासाठी महिलावर्गाकडून लगबग केली जात आहे. शहरातील बाजारपेठेतही कैरी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाली आहेत. कैरीच्या लोणच्याप्रमाणे उन्हाळ्यात लिंबाचे लोणचे देखील महाग झाले आहे.

- Advertisement -

 

बाजारात मिळणारे लोणचे चांगले असते. परंतु घरात बनविलेले लोणचे अधिक चवदार असल्याने यंदा मसाले महाग,कैरी महाग झाली तरी देखील चवीमुळे आम्ही घरगुती लोणचे केले आहे.

- Advertisement -

– मिताली पवार,गृहिणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -