Thursday, December 7, 2023
घरमानिनीRelationshipवयानुसार 'या' कारणास्तव मुलांना वाटते भीती

वयानुसार ‘या’ कारणास्तव मुलांना वाटते भीती

Subscribe

मुलांचे मन नाजूक असते. ते अगदी सहज कोणत्याही गोष्टीसाठी घाबरले जातात. तुम्ही पाहिले असेल की, काही मुलांना एखाद्या खास गोष्टींचा भीती वाटते आणि मोठ्यांच्या तुलनेत लहान मुल अधिक घाबरली जातात. काही वेळेस मुलांना भीती वाटणे सामान्य असते. अशा प्रकारच्या भावनांपासून मुलांना सावधान आणि सतर्क राहण्यास मदत होते. ज्या गोस्टी मुलांसाठी नव्या आहेत अथवा वेगळ्या आहेत किंवा पहिल्यांदा करताना भीती वाटते त्यामागील कारणे काय असू शकतात हे जाणून घेऊयात.

मुल सुद्धा होतात एंग्जायटीचे शिकार
जेव्हा मुलं 8-9 महिन्यांचे असतात तेव्हा ते केवळ लोकांचे चेहरा ओळखतात. त्यामुळे अनोखळी लोकांची चेहरे पाहिल्यानंतर ते घाबरले जातात. त्यांना आपल्या पालकांपासून दूर जाणे असुरक्षित वाटते. या व्यतिरिक्त 10 महिने ते 2 वर्षांपर्यंतच्या मुलांना आपल्या पालकांपासून दूर जाण्याची भीती वाटते. त्यांना रात्री एकटे झोपणे किंवा डेकेयरमध्ये राहणे पसंद पडत नाही. ते केवळ आपल्या पालकांसोबत राहणे सुरक्षित मानतात.

- Advertisement -

खऱ्या आयुष्यात वाटते भीती
जेव्हा ही मुलं सात वर्ष किंवा त्यापेक्षा मोठी होतात तेव्हा त्यांना खरं जग कस आहे हे कळण्यास सुरुवात होते. त्यांना कळते की, खरं काय आणि खोटं काय. मुलांना अशा लोकांबद्दल ही कळते जी चांगले वाईट वागतात. काही नैसर्गिक परिस्थितींबद्दल विचार करून ही घाबरतात. काही मुलांना आपल्या परिवारापासून दूर जाण्यास घाबरतात.

टीनएजची भीती
टीनएजच्या वयात शाळा आणि मित्र मुलांच्या आयुष्याच्या एक महत्त्वाचा हिस्सा बनवतात. त्यांना होमवर्क, क्लासमध्ये परफॉर्मेन्स किंवा परीक्षेच्या गुणांबद्दल त्यांना चिंता सतावू शकते. या वयातील मुलं लूक्स बद्दल ही सतर्क राहतात.

- Advertisement -

पालकांनी अशी करावी मुलांची मदत
जर तुमच्या मुलांना भीती वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे मदत करू शकता.
-कमी वयातील मुलांना समजून घ्यावे आणि त्यांना असे जाणवून द्या की ते सुरक्षित आहेत. असे ही पटवून द्या की, ते तुमच्या जवळ आहेत. मुलांना सांगा की, तुम्ही त्यांच्याजवळ आहात.
-जेव्हा मुलं थोडं मोठ होईल तेव्हा त्याचे ऐका सुद्धा. मुलांना त्यांच्या भावना शेअर करण्यास सांगा. मुलांना नव्या लोकांच्या आसपास सुरक्षितीत वाटेल असे त्यांच्याशी वागा.


हेही वाचा- लहान सहान गोष्टींवरून रडणाऱ्या मुलाला असे करा हँडल

- Advertisment -

Manini