घरमहाराष्ट्रGautami Patil : गौतमीच्या कार्यक्रमात तुफान राडा, अब्दुल सत्तार यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ...

Gautami Patil : गौतमीच्या कार्यक्रमात तुफान राडा, अब्दुल सत्तार यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

Subscribe

Gautami Patil : नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) ही तिच्या नृत्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करत असतात. मात्र तिच्या प्रत्येक कार्यक्रमात काही ना काही राडा होतच असतो. आरोग्य व कुटुंब व कल्याण मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवस आणि गौतीम पाटील हे समीकरण जुळून आले आहे. सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा दरम्यान तुफान राडा झाला आहे.

हेही वाचा… अल्पसंख्याक समाजासाठी 500 कोटींचा निधी – अब्दुल सत्तार

- Advertisement -

रोग्य व कुटुंब व कल्याण मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तुफान राडा झाला. यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मात्र तरीही प्रेक्षकांनी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात प्रचंड राडा केला. मंत्री अब्दुल सत्तार सुद्धा संतापले. त्यांनी वारंवार खाली बसण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात काही गद्दार लोक आले आहे. त्यांना पोलीस सरळ करतील आणि कार्यक्रम सुरु होईल, असे सत्तार व्हिडिओत बोलताना दिसत आहे. जोपर्यंत तुम्ही खाली बसणार नाही, तोपर्यंत कार्यक्रम सुरु होणार नाही, असे ते बोलत आहे. परंतु त्यानंतर गोंधळ सुरु होता. यामुळे पोलिसांनी गोंधळ करणाऱ्यांवर सौम्य लाठीमार केला.

- Advertisement -

गौतमी पाटीलच कार्यक्रम म्हटल्यानंतर खेड्यापाड्यातून अनेक तरूणांनी गर्दी केली होती. मात्र कार्यक्रम सुरू होताच तरूणांनी नेहमीप्रणाचे हुल्लडबाजी करत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यांमुळे कार्यक्रम मध्यस्थीच बंद पडला. अब्दुल सत्तार यावेळी तरूणांवर चांगलेच भडकल्याचं पाहायाल मिळालं. सत्तार यांनी स्टेजवर येत माईक हातात घेतला आणि हुल्लडबाजी करणाऱ्या तरूणांवर लाठीमार करण्याचे आदेश पोलिसांना दिले. इतकचं नाही तर त्यांनी अब्दुल सत्तार यांनी भर स्टेजवरून तरूणांना शिळीगाळ देखील केला. सत्तरांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी सत्तारांवर टीका करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -