Wednesday, May 15, 2024
घरमानिनीBeautyचेहऱ्याला ग्लिसरीन लावण्यापूर्वी 'या' टीप्स करा फॉलो

चेहऱ्याला ग्लिसरीन लावण्यापूर्वी ‘या’ टीप्स करा फॉलो

Subscribe

ग्लिसरिनचा वापर त्वचा, केस आणि ओठांसह बॉडी केअर प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी केला जातो. अशातच ग्लिसरीनचे फायदे तुम्हाला माहितेयत का? ग्लिसरीन मधील काही गुण काही त्वचेसंबंधित फायदेशीर ठरतात. परंतु चेहऱ्यावर कशा प्रकारे अप्लाय करायचा हे माहितेय का?

ग्लिसरीनला ग्लाइसरॉल असे सुद्धा म्हटले जाते. हे एक नॅच्युरल कॉमपॉन्ड आहे. जो वेजिटेबल ऑइल किंवा एनिमल फॅटमधून मिळवले जाते. याची टेस्ट गोड असते. ते स्पष्ट, रंगहीन, गंधहिन सिरप सारखा एक द्रव पदार्थासारखे आहे. ग्लिसरीन एक ह्यूमेक्टेंट आहे. जो एक प्रकारचा मॉइस्चराइजिंग एजेंट आहे.

- Advertisement -

-मॉइश्चराइजरच्या रुपात
तुम्ही ग्लिसरीनचा मॉइश्चराइजरच्या रुपात वापर करू शकता. मात्र लक्षात ठेवा की, चेहऱ्यावर केवळ ग्लिसरीनचा वापर करू नका. कारण ते घट्ट असतात. याला धूळ चिकटली जाऊ शकते. त्यामुळे पिंपल्स किंवा दाणे येऊ शकतात. त्यामुळे ते पातळ रुपात अप्लाय करावे. ग्लिसरीन जर चेहऱ्याला लावायचे असेल तर त्यात पाणी किंवा थोडं गुलाब पाणी मिक्स करा.

-ब्लॅकहेड्ससाठी वापर
ब्लॅकहेड्समुळे त्वचा ड्राय आणि डल होते. त्यामुळे त्यापासून दूर राहण्यासाठी तुम्ही ग्लिसरिनचा वापर करू शकता.

- Advertisement -

-क्लिंजरच्या रुपात वापर करा
ग्लिसरीन तुमच्या त्वचेत जाऊन इम्प्योरिटीज बाहेर काढण्यास मदत करतात. तुम्ही ग्लिसरीनचा वापर करून घरच्या घरी क्लिंजर तयार करू शकतात.

-टोनरच्या रुपात
ग्लिसरीन तुमचे पोर्स टाइट करतात. अशातच तुम्ही टोनरच्या रुपात याचा वापर करू शकता. जर टोनरच्या रुपात वापर करत असाल सुनिश्चित करा की, याचा अत्याधिक वापर करू नका.

-अँन्टी एजिंग मास्कच्या रुपात वापर करा
वयासह त्वचेसंबंधित समस्या उद्भवतात. अशातच तुम्ही ग्लिसरीनचा वापर करून तुम्ही त्वचेला पुरेशा प्रमाणात मॉइश्चराइज करत फाइन लाइन आणि रिंक्लस दूर करू शकता.

-डी-टॅनच्या रुपात
वास्तविकरित्या ग्लिसरीन हलक्या सनस्क्रिनच्या रुपात वापर करू शकता. त्यामुळे ओलसरपणा कायम राहतो. जर तुम्ही आधीपासूनच टॅन आहे तर ग्लिसरीन तुम्हाला पोर्समध्ये जमा झालेली धुळ आणि घाण काढून तुमचा रंग उजळवण्यास मदत करतो.


हेही वाचा- चेहरा उजळ दिसण्यासाठी बटाट्याचा ‘या’ 5 प्रकारे करा वापर

- Advertisment -

Manini