घरपालघरElectricity Price Hike : वीज ग्राहकांना वीज दरवाढीचा लागणार झटका

Electricity Price Hike : वीज ग्राहकांना वीज दरवाढीचा लागणार झटका

Subscribe

० ते १०० वीज युनिटमागे ३० पैसे, १०१ ते ३०० वीज युनिटमध्ये ६५ पैसे, ३०१ ते ५०० वीज युनिटमध्ये ९४ पैसे तर ५०० पेक्षा अधिक युनिट असल्यास एक रूपया सात पैशांची वाढ करण्यात आली आहे.

पालघर: उन्हाळ्यामध्ये विजेच्या मागणीत मोठी वाढ होत असल्याने वीज नियामक आयोगाकडून नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच सर्वत्र नवीन वीजदर लागू करण्यात आले आहे. वीजबिलात सरासरी ७.५० टक्क्यांनी तर स्थिर आकारात १० टक्के दरवाढ होणार आहे. वीज नियामक आयोगाने एका वर्षाच्या नियंत्रण कालावधीसाठी मंजूर केलेली वीज दरवाढ नव्या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२४ पासून ३१ मार्च २०२५ पर्यंत लागू होणार आहे.

ग्राहकांच्या वीज वापर गटानुसार विजेचे वेगवेगळे दर आकारण्यात येणार असून त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना वाढीव वीजदराचा फटका सहन करावा लागणार आहे. घरगुती संवर्गातील, वाणिज्यिक ग्राहक, सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे ग्राहक, कृषि ग्राहक, लघु औद्योगिक ग्राहकांना, पथदिवे, सरकारी कार्यालये व रुग्णालय अशा सर्व वर्गवारीतील ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. १ एप्रिल २०२३ च्या तुलनेत १ एप्रिल २०२४ पासून सर्वच संवर्गातील ग्राहकांचा स्थिर आकार वाढणार आहे.

- Advertisement -

० ते १०० वीज युनिटमागे ३० पैसे, १०१ ते ३०० वीज युनिटमध्ये ६५ पैसे, ३०१ ते ५०० वीज युनिटमध्ये ९४ पैसे तर ५०० पेक्षा अधिक युनिट असल्यास १ रूपया ७ पैशांची वाढ करण्यात आली आहे. २०२४-२५ या वर्षासाठीच्या महसुली आवश्यकतेचा आढावा घेत दर निश्चित केले असून वीज दरवाढीबाबत नुकतेच आदेश दिले आहेत. १ एप्रिलपासून महावितरण नवे वीजदर लागू झाले आहेत. दरवाढीबरोबरच उन्हाळ्यात विजेचा वाढता वापर हेही बिल वाढण्याचे मुख्य कारण आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -