Wednesday, May 1, 2024
घरमानिनीKitchenघरच्या घरी असे बनवा Greek Yogurt

घरच्या घरी असे बनवा Greek Yogurt

Subscribe

साधारण दह्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र तुम्हाला ग्रीक योगर्टबद्दल माहितेय का? हे दही एखाद्या दुसऱ्या फूड प्रोडक्ट्स प्रमाणेच असते. मात्र बहुतांश डाएट करणारी लोक याचे सेवन करणे पसंद करतात. ग्रीक योगर्टमुळे केवळ एनर्जीच नव्हे तर काही प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांसाठी फायदेशीर मानले जाते. अशातच घरच्या घरी ग्रीक योगर्ट कसे बनवायचे याचीच रेसिपी आपण आज पाहणार आहोत.

- Advertisement -

साहित्य-
एक लीटर दूध
अर्धा वाटी दही
सुती कापड आणि गाळणी

- Advertisement -

कृती-
-घरी ग्रीक योगर्ट तयार करण्यासाठी सर्वात प्रथम एका भांड्यात दूध उकळून घ्या आणि काचेच्या कंटेनरमध्ये ठेवा. आता ते 110 डिग्री मध्ये थंड होण्यास ठेवा आणि सतत हलवत रहा.
-ग्रीक योगर्ट तयार करण्यासाठी एका लहान बाउलमध्ये अर्धा कप दूध आणि अर्धा कप दही घ्या. या दोन्ही गोष्टी व्यवस्थितीत मिक्स करा आणि दूध असणाऱ्या कंटेरनरमध्ये टाका. दही आणि दूध चमचाच्या मदतीने व्यवस्थितीत मिक्स करा. कंटेनरला एका कापडाने झाकून ठेवा. उत्तम रिजल्टसाठी ते सुक्या आणि गरम ठिकाणी ठेवा. ग्रीक योगर्टच्या बॅटरला कमीतकमी 12 तासांसाठी ठेवा. 12 तासांनंतर ते 2 तास फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
-आता एका भांड्यावर गाळणी ठेवून त्यावर सुती कापड ठेवा. कापडावर तुमचे तयार झालेले योगर्ट टाका. त्यानंतर दही असणारा कपडा बांधून अर्धातासाठी असाच ठेवा. सुती कापड अर्धा तासांनी उघडा आणि त्यामधील सर्व पाणी निघून गेले असेल. अशा प्रकारे तुमचे ग्रीक योगर्ट तयार होईल. तुम्ही ते प्लास्टिक किंवा ग्लासच्या कंटेनरमध्ये स्टोर करु शकता.


हेही वाचा- परफेक्ट फिल्टर कॉफी बनवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

- Advertisment -

Manini