Sunday, October 1, 2023
घर मानिनी Health हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅक मध्ये 'हा' आहे फरक

हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅक मध्ये ‘हा’ आहे फरक

Subscribe

आजकाल बदलत्या आणि बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे लोकांना विविध आजार होत आहेत. गेल्या काही वर्षांपासून हार्ट अटॅकच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी वयस्कर लोकांमध्ये हार्ट अटॅकची समस्या दिसून यायची. मात्र आता लहान मुलांमध्ये सुद्धा हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. याचसोबत पॅनिक अटॅकची समस्या ही वाढली गेली आहे. (Heart attack vs Panic attack)

एक्सपर्ट्सच्या मते, जेवढा धोकादायक हार्ट अटॅक आहे तेवढाच पॅनिक अटॅक सुद्धा. काही वेळेस लोकांना हार्ट अॅटक आणि पॅनिक अटॅक हा एकच असल्याचे वाटचे. त्याच कारणास्तव रुग्णाला कळत नाही त्याच्यासोबत नक्की काय होत आहे. जर तुम्हाला या दोघांमधील फरक माहिती नाही तर याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

- Advertisement -

हार्ट अटॅक म्हणजे काय?
जेव्हा व्यक्तीच्या रक्तात पोहचवणाऱ्या धमन्यांमध्ये बाधा येत असेल किंवा धमन्या 100 टक्के ब्लॉक होतात त्या स्थितीत व्यक्तीला हार्ट अटॅक येतो. हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही लक्षण व्यक्तीमध्ये दिसून येतात. त्यामध्ये छातीत दुखणे, छाती जड होणे अशी काही सामान्य लक्षणे आहेत. या व्यतिरिक्त श्वास फुलणे, घाम येणे किंवा उलटी येणे ही त्याची काही सामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणं लगेच किंवा काही तासांनी दिसतात.

पॅनिक अटॅक म्हणजे काय?
एक्सपर्ट्सच्या मते, पॅनिक अॅटक एक प्रकारची एंग्जायटी म्हणजेच चिंतेची स्थिती. जी गंभीर होण्यासह अचानक विकसित होते. पॅनिक अटॅक दरम्यान हृदयाचे ठोके वाढले जातात, श्वास फुलला जातो, डोके दुखणे आणि शरिर थरथरणे अशा समस्या होतात.

- Advertisement -

हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅक मधील सामान्य लक्षणे
रिपोर्टनुसार, ब्रिटेनच्या हेल्थ एक्सपर्ट्स असे म्हणतात हार्ट अटॅक आणि पॅनिक अॅटक दोघांमध्ये छातीत दुखणे, श्वास घेण्यास समस्या आणि घाम येणे अशी सामान्य लक्षणे दिसून येतात.

हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅक मधील फरक काय?
पॅनिक अटॅक कधीही येऊ शकतो. तुम्ही आराम करत असाल किंवा झोपत असाल तरीही अशी समस्या येऊ शकते. हार्ट अटॅक तेव्हा येतो जेव्हा तुम्ही अधिक काम करत असाल आणि हार्ट अटॅक छातीपर्यंत राहत नाही तर काही लोकांना हात आणि मानेपर्यंत पोहचतो.


हेही वाचा-  ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत नसण्याची ‘ही’ आहेत लक्षणे

- Advertisment -

Manini