Friday, April 26, 2024
घरमानिनीपिरियड्समध्ये दिवसातून किती वेळा पॅड बदलावे?

पिरियड्समध्ये दिवसातून किती वेळा पॅड बदलावे?

Subscribe

मासिक पाळी हा प्रत्येक महिलेसाठी नाजुक विषय आहे. या दिवसात महिलांना आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

मासिक पाळी हा प्रत्येक महिलेसाठी नाजुक विषय आहे. या दिवसात महिलांना आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. कारण याच दिवसात युरीन इम्फेक्शन ,स्किन इन्फेक्शनबरोबरच  त्वचेशी संबंधित इतर संसर्गजन्य आजारांचा महिलांना सर्वाधिक धोका असतो. त्यासाठी पॅड वेळेत बदलायला हवे. महिलांनी पिरियड्समध्ये योनी मार्गाच्या स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी.

- Advertisement -

त्यासाठी पॅड वेळेच्या वेळी बदलणे गरजेचे असते. पिरियडमध्ये होणाऱ्या ब्लिडींगच्या फ्लोवर पॅड बदलणे अवलंबून असते. पिरियड्सच्या पहील्या २ ते ३ दिवस ब्लिडींग फ्लो जास्त असतो. नंतर तो कमी होतो. साधारणत काहीजणींचा पिरियड्सचा कालावधी हा सात दिवसांचा असतो. तर काही जणींचे पाचव्या दिवशीच पिरियड्स थांबतात. ही सर्व प्रक्रिया हार्मोन्सवर अवलंबून असते. यामुळे तज्ज्ञांच्या मते या दिवसात सामान्य फ्लो होत असल्यास महिलांनी दिवसात ३ ते ६ तासांनी पॅड बदलायला हवे.

- Advertisement -

तर ज्या महिलांना फ्लो जास्त होतो त्यांनी २ तासांनी पॅड बदलावे. जेणेकरुन संसर्ग होणार नाही. कारण जर खराब झालेले पॅड जास्त वेळ ठेवले तर त्यावर बॅक्टेरिया निर्माण होऊन संसर्ग होऊ शकतो.

दरम्यान, सध्या बाजारात फ्लो नुसार वापरता येतील असे विविध प्रकारचे पॅड उपलब्ध आहेत. यामुळे तुम्हाला गरजेनुसार पॅड निवडता येतात. त्यातही शक्यतो कॉटनचे पॅड वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. कारण काही कंपन्यानी फक्त महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी  सेंटेट पॅड आणि फॅन्सी मटेरियलचे पॅड बाजारात आणले आहेत. पण त्यामुळे संसर्ग होण्याचाच धोका अधिक असल्याने कंपन्याच्या भुलथापांना आणि आकर्षक पॅड्सच्या लूक्सला बळी न पडता महिलांनी वैद्यकिय सल्ल्यानुसारच पॅड वापरावेत.

तसेच हल्ली पिरियड्साठी सॅनटरी पॅडबरोबरच टॅम्पोन्स, आणि कप्सही वापरले जातात. ते ही वेळच्या वेळी बदलणे आणि स्वच्छ करणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.

 

 

- Advertisment -

Manini