लग्नाचा योग जुळून येत नाही? मग आजपासूनच करा ‘हे’ उपाय

योग्य वयात लग्न झाले नाही की, अनेक समस्या सामना निर्माण होतात.करिअरच्या नादात अनेक खूप उशीरा लग्न करण्याचा निर्णय घेतात. गेल्या दहा-बारा वर्षांपासून लग्न उशीरा करण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले आहे. अनेकदा लग्न करण्याची इच्छा असूनही हवातसा जोडीदार मिळत नाही. तसेच अनेकदा सर्व गोष्टी बरोबर असूनही लग्न होण्यासाठी अनेक समस्या निर्माण होतात. अनेकदा यामागे कुंडलीतील ग्रह दशा ठिक नसल्याचे कारण देखील दिले जाते.

ज्योतिष शास्त्रामध्ये, लवकर लग्न करण्यासाठी आणि लग्न करण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर काही उपाय सांगण्यात आले आहेत. जेणेकरुन या उपायांमुळे तुमच्या कुंडलीतील ग्रह शुभ परिणाम देतील.

लग्नाचा योग जुळण्यासाठी करा ‘हे’ उपाय

  • प्रत्येक गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा. यामध्ये बेसन, मिठाई, पिवळे वस्त्र, चनाडाळ, गूळ तुम्ही घेऊ शकता.
  • लग्न लवकर व्हावे यासाठी 6 मुखी रुद्राक्ष धारण करा.
  • लग्न लवकर व्हावे यासाठी गणपती बाप्पाच्या माथ्यावर हळदीचा टिळा लावा. तसेच त्यांच्याकडे लग्नासाठी प्रार्थना करा आणि त्यानंतर तुमच्या माथ्यावरही हळदीचा टिळा लावा.
  • दररोज सकाळी लवकर उठून सूर्याला हळद टाकलेले अर्घ्य अर्पण करा.
  • कुंडलीतील शुक्र ग्रह कमजोर असल्यावर देखील लग्नासंबंधीत समस्या निर्माण होतात. त्यामुळे शुक्र ग्रहाचे उपाय करा.
  • शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गेची पूजा-उपासना करा.
  • शुक्र ग्रहाच्या मंत्राचा जप करा.

हेही वाचा :

तुळशी विवाह पार पडताच सुरू होणार लग्नकार्य; जाणून घ्या नोव्हेंबर-डिसेंबरमधील मुहूर्त