घरदेश-विदेशआम्हालाही दत्तक घ्या, तुमचा देश...; पाकिस्तानी ब्लॉगरचे पंतप्रधान मोदींना आवाहन

आम्हालाही दत्तक घ्या, तुमचा देश…; पाकिस्तानी ब्लॉगरचे पंतप्रधान मोदींना आवाहन

Subscribe

नवी दिल्ली : पाकिस्तानला पुराचा तडाखा बसल्यानंतर पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. त्यात आतंकवादसारख्या घटना घडत असतात, महागाई गगनाला भिडली आहे, असे असताना एका व्यक्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) व्हिडिओच्या माध्यमातून पाकिस्तानला दत्ताक घेण्याचे आणि भारतात विलीन करण्याचे आवाहन केले आहे.

पाकिस्तानी ब्लॉगरचा (Pakistani Blogger) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो या व्हिडिओमध्ये भारताची स्तुती करताना ‘बख्श दो यार काश्मिरी को, असे उद्गार काढले आहेत. त्याने म्हटले की, जगावर राज्य करणाऱ्या देशाशी काश्मिरचा संबंध आहे. अमेरिका, ब्रिटन आणि जगावर भारताचे वर्चस्व आहे. भारत देश व्यवसायाबद्दल, आयटी बद्दल आणि उत्पादकतेबद्दल बोलत आहे आणि आपला समाज काय करत आहे? असा प्रश्नही त्याने उपस्थित केला आहे. लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत.

- Advertisement -

या ब्लॉगरने पंतप्रधान मोदींना पाकिस्तानला दत्तक घेण्याची विनंती केली आहे. पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. जेव्हापासून येथे पुराचा तडाखा बसला तेव्हापासून देश सावरू शकला नाही. परदेशी देशांनीही हात उचलले आहेत. त्यामुळे पाकिस्तानला भारतात विलीन करून घ्या, असे हा ब्लॉगर पंतप्रधान मोदींना व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे.

बिर्याणीची चव वाढवण्यात समाज व्यस्त
आमच्या समाजातील लोक बिर्याणीच्या चवीत हरवले आहेत? बिर्याणीची चव कशी वाढवता येईल, कबाबची चव कशी वाढवता येईल याचा विचार समाज करत असतो. त्यामुळे आम्हाला तुमच्या बाजूने घ्या अशी विनंती या ब्लॉगरने पंतप्रधान मोदींना केली आहे. जेणेकरून चांगल्या अर्थव्यवस्थेचा, भारतीय पासपोर्टचा आम्हाला लाभ मिळू शकेल, अशा ब्लॉगरला विश्वास आहे.

- Advertisement -

महागाई गगनाला भिडली
पाकिस्तानची अवस्था कोणापासून लपलेली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अनेक देशांसमोर हात पसरले आहेत, पण त्यांना कोणी मदत करायला तयार नाही. पाकिस्तानला काही लोक आपल्या सोबत असल्याचे वाटले होते, त्यांनीही साथ दिली नाही. तुर्की आणि सौदी अरेबियानेही सहकार्य केले नाही. त्यामुळे महागाई गगनाला भिडली आहे.

जनता सरकारवर नाराज
पाकिस्तानमध्ये कोणाचेही सरकार स्थापन झाले तरी राज्य फक्त लष्कराचे असते. इम्रान खान सत्तेत असतानाही हीच परिस्थिती होती. नेते एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करत आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सरन्यायाधीशांना प्रश्न विचारत आहेत. यामुळे लोकशाहीचे स्तंभ ढासळले आहेत. त्यामुळे जनता सरकारवर नाराज असून अडचणीत सापडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -