Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenKitchen Tips : पाण्याचा माठ या ट्रिक्सने करा स्वच्छ

Kitchen Tips : पाण्याचा माठ या ट्रिक्सने करा स्वच्छ

Subscribe

नैसर्गिक थंड पाण्यासाठी मातीचा माठ हा सर्रास सगळीकडे आपल्याला पाहिला मिळतो. कडक उन्हाळ्यात दुपारी थंडगार पाणी प्यायल्याने पोट व मन दोन्ही शांत व्हायला मदत होऊ शकते पण तुम्ही हे पाणी कशाप्रकारे थंड केले आहे हे सुद्धा महत्त्वाचे ठरते. अनेकदा फ्रीजमधील पाण्याने सर्दी, खोकला असे त्रास वाढण्याची शक्यता असते या तुलनेत मातीच्या माठातील (clay pot) पाणी हे शुद्ध आणि योग्य पर्याय ठरते. तुम्ही जर माठातील पाणी पित असाल तर एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायला हवी की जसे याचे फायदे आहेत तसेच नीट स्वच्छ न केल्यास यामुळे नुकसानही होऊ शकते. त्यामुळे आज आपण माठ स्वच्छ धुण्याचे काही उपाय पाहणार आहोत.

माठ स्वच्छ करण्याचे उपाय :

  • एका भांड्यात नाचणीचे पीठ घ्या आणि त्यात व्हिनेगर घाला आणि मिक्स करा. तयार केलेली पेस्ट माठाच्या आत आणि बाहेर दोन्ही बाजूंनी लावा आणि भांडे स्क्रबरने किंवा हाताने स्वच्छ करा. यानंतर माठ 24 तास पाण्यात ठेवा. नंतर पाण्यातून बाहेर काढा आणि स्वच्छ पाण्याने भरण्यासाठी त्याचा वापर सुरू करा.
  • लिंबाची साल गरम पाण्यात घालून या सालीने माठाचा आतील भाग स्वच्छ करू शकता. तसेच नारळाच्या किशीने माठ आतून बाहेरून घासून धुवू शकता.
  • बेकिंग सोडा व पाण्याच्या मिश्रणाने माठ आतून स्वच्छ करू शकता. शक्यतो भांड्यांचा साबण किंवा काथ्या मातीच्या भांड्यावर वापरणे टाळावे.
  • माठ धुवून झाल्यावर कडक उन्हात सुकवत ठेवा. जेणेकरून उन्हामुळे जंतू नष्ट होण्यास मदत होऊ शकते. कधीच माठ जमिनीवर ठेवू नका जमिनीवर एखादा स्टॅण्ड ठेवल्यानंतर त्यावर माठ ठेवा. यामुळे पाणी सतत हलणार नाही आणि थंड राहील.
  • माठातलं पाणी नेहमी झाकून ठेवा. यामुळे पाणी थंड राहील आणि आत धूळ शिरणार नाही. जर तुम्ही माठाच्या तोंडाला कॉटनचा कपडा बांधणार असाल तर पाणी स्वच्छ आणि थंड राहील.
  • माठातलं पाणी रोज बदला जर रोज बदलणं शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा पाणी बदला. याशिवाय माठ रोजच्या रोज स्वच्छ करत राहाल. माठ स्वच्छ करण्यासाठी कोणतंही केमिकल्सयुक्त पाणी वापरू नका.
- Advertisment -

Manini