घरमहाराष्ट्रLok Sabha 2024: कोणती फाईल उघडली की मनसेचा नमो निर्माण पक्ष झाला;...

Lok Sabha 2024: कोणती फाईल उघडली की मनसेचा नमो निर्माण पक्ष झाला; राऊतांचा खोचक सवाल

Subscribe

भाजपाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अशी कोणती फाईल उघडली की त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण हा पक्ष नमो निर्माण पक्ष झाला? अशी विचारणा ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांनी केली.

मुंबई: भाजपाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अशी कोणती फाईल उघडली की त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण हा पक्ष नमो निर्माण पक्ष झाला? अशी विचारणा ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांनी केली. तसंच, प्रबोधनकार ठाकरेंचे विचार समजून घ्या, असा सल्लाही राऊतांनी राज ठाकरेंना दिला. (Lok Sabha Election 2024 Thackeray Group MP Sanjay Raut Criticized Raj Thackeray Called MNS Namo Nirman Party )

महाराष्ट्राच्या शत्रूंना राज्यात पाय ठेवायला देऊ नका, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. अचानक असा काय चमत्कार, साक्षात्कार झाला हे राज ठाकरेंनाच विचारावं लागेल. अचानक पलटी मारून ते आता महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा देत आहेत. आता जनतेला काय उत्तर द्याल? राज ठाकरेंनी अशी कोणती फाईल उघडली आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisement -

तुमचा पक्ष नमो निर्माण का झाला?

गेल्या काही काळापासून महाराष्ट्राची अक्षरश: लूट सुरू आहे, खोक्याचं अत्यंत घाणेरडं राजकारण सुरू आहे. त्याचे सूत्रधार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आहेत. राज्यातून उद्योग पळवला जातोय, मुंबई तोडण्याचा, मुंबई विकलांग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला जो पक्ष आहे, तोच महाराष्ट्राच्या दुश्मनांना, शत्रूंना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात शंका उत्पन्न होतात. त्याचीच उत्तर राज ठाकरेंना द्यावी लागतील.

असं काय घडलं की तुम्ही राज्याच्या शत्रूंना पाठिंबा देत आहात, असा प्रश्न लोकं त्यांना विचारतील. तुमचा जो नवनिर्माण पक्ष आहे त्याचा नमो निर्माण पक्ष का झाला? त्याची का गरज पडली? हे राज ठाकरेंनी सांगितलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

(हेही वाचा: Lok Sabha 2024 : शरद पवार गटाकडून 10 पैकी 9 उमेदवार जाहीर, तिसऱ्या यादीत सातारा, रावेर; माढाचा तिढा कायमच)

स्वार्थासाठी कधीच भाजपासोबत नव्हतो

राऊत म्हणाले की, आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी लढत आहोत. समोर नरेंद्र मोदी असोत की अमित शहा, आम्ही शरणगती पत्करणार नाही, असंही राऊत यांनी नमूद केलं. आम्ही कधीही स्वार्थासाठी भाजपासोबत राहिलो नाही. हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन या सगळ्यांनी त्या काळात ही युती केली होती. ती 25 वर्षे चालली. पण भाजपाने जेव्हा त्यांचे खरे दात दाखवायला सुरूवात केली, तेव्हा आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो आणि आमची स्वतंत्र भूमिका मांडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -