घरताज्या घडामोडीPawar Vs Pawar : मुलगी ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत...

Pawar Vs Pawar : मुलगी ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते! अजित पवारांना शरद पवारांचे थेट उत्तर

Subscribe

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात (7 मे) होणाऱ्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात मतदान होणार आहे. मात्र येथील निवडणूक सध्या राज्यभरात चर्चेचा विषय झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच बारामती दौरा केला. यावेळी त्यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी काही सभांनाही हजेरी लावली. यावेळी त्यांनी पवार आडनाव असेल तिथेच मतदान करा, असे आवाहन बारामतीकरांना केले. आडनावावरुन मतदानाचे आवाहन करणाऱ्या अजित पवारांना शरद पवार गटाने बुरसटलेल्या विचारांचे म्हणत टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

अजित पवार यांनी बारामतीमध्ये पवार अडनाव असणाऱ्या उमेदवारालाच मतदान करा असे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, बारामतीकरांसमोर यंदा बाका प्रसंग निर्माण झाला आहे. बारामतीकरांनी आतापर्यंत पवारांना साथ दिली आहे. 1991 साली मुलाला म्हणजे अजित पवारांना निवडून दिले. त्यानंतर वडिलांना – म्हणजे शरद पवारांना विजयी केले. त्यानंतर तीन टर्म मुलीला – म्हणजेच सुप्रिया सुळेंना बारामतीकरांनी निवडून दिले. आता सुनेला संधी द्या. पवार आडनावापुढेच मतदान करा.

- Advertisement -

वंशाचा दिवा-आडनावाची फुशारकी हे बुरसटलेले विचार – शरद पवार

अजित पवारांनी पवार नावालाच मतदान करा, असे म्हटले आहे. त्यांचे हे विधान बुरसटलेली विचारधारा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केली आहे. मुलगी ही फक्त वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते, हे शरद पवारांचे विचार आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र हा देशातील इतर राज्यांपेक्षा वेगळा ठरतो. हे बुरसटलेल्या विचारधारेच्या आहारी गेलेल्यांना वंशाचा दिवा, आडनावाची फुशारकी, माहेरवास, सासुरवास ह्यात रमू द्या, असे म्हणत भाजप आणि अजित पवार यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने शरद पवारांचा ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेलांनी घेतलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यासोबत म्हटले आहे की, बुरसटलेल्या विचारधारेच्या आहारी गेलेल्यांना वंशाचा दिवा, आडनावाची फुशारकी, माहेरवास, सासुरवास ह्यात रमू दे, त्यांना प्रागतिक महाराष्ट्र कळलाच नाही !

- Advertisement -

बारमती मतदारसंघ महायुतीकडून अजित पवार गटाला सोडण्यात आला आहे. येथून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या घड्याळ चिन्हावर लढत आहेत. तर शरद पवार गटाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या तुतारी चिन्हासह मैदानात आहेत. नात्याने नणंद-भावजय असा हा सामना बारामतीमध्ये होत आहे. पवार गटाच्या या टीकेला आता अजित पवार काय प्रत्युत्तर देतात हे पाहाणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : Lok Sabha 2024 : बारामतीत पवारांनाच निवडून आणा; अजित दादांच्या आवाहनाने पिकला हशा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -