Tuesday, April 30, 2024
घरमानिनीBeauty Tips : Body polishing म्हणजे काय? घरच्या घरी करा 'हे' उपाय

Beauty Tips : Body polishing म्हणजे काय? घरच्या घरी करा ‘हे’ उपाय

Subscribe

Body polishing करा घरच्या घरी 'या' सोप्या टिप्स करा फॉलो.

प्रत्येकालाच आपल्या चेहऱ्याप्रमाणे आपले शरीर चमकावे असे नेहमी वाटते.आणि हि गोष्ट खूप स्वाभाविकच आहे. अशातच आपण बॉडी पॉलिशिंगचा विचार हा करत असतोच. बॉडी पॉलिश केल्याने बॉडीची डेड स्किन (deadskin) निघून जाते. आणि नवीन स्किन नव्याने येते त्यामुळे बॉडीला एक प्रकारचे तेज येते.

तसेच बॉडी पॉलिशिंगमुळे स्किन खूप मऊ आणि स्वच्छ होते. आपण बॉडी पॉलिशिंगला सौंदर्य उपचार देखील म्हणू शकता. अनेकजण पार्लरमध्ये जाऊन बॉडी पॉलिशिंग करून घेतात, पण त्याचा चार्ज खूप महाग असतो. अशातच घरच्या घरी नैसर्गिकरित्या बॉडी पॉलिश कसे करता येईल याकडे आपले जास्त लक्ष असते.

- Advertisement -

The Buckhead Massage Company - Benefits and facts : Body polish treatment

Body polishing करण्यासाठी या टिप्स करा फॉलो-

- Advertisement -
  • शरीराला बदाम तेल आणि हळद पावडर यांचे मिश्रण त्याची पेस्ट करून बॉडीला मसाज करा.
  • तसेच या मिश्रणाने संपूर्ण शरीराची मालिश करा. या मिश्रणाने 30 मिनिटे मसाज करा.
  • यामुळे शरीराचे रक्ताभिसरण (blood Circulation) सुरळीत राहील.
  • यांनतर हे झाल्यावर आंघोळ करण्यापूर्वी कच्च्या दुधात बेसन मिसळा.
  • ही पेस्ट अंगावर चांगली चोळा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ करा. यामुळे शरीरावर एक चांगली चमक येईल.
  • तसेच आणखी काही गोष्टी बॉडी पॉलिशिंगसाठी हव्या असतील तर दही, गुलाबपाणी आणि दलिया पावडर घ्या.
  • हे करत असताना तीन चमचे दही घ्या, त्यात गुलाबजल (rose water)आणि ओटमील पावडर टाकून त्याची पेस्ट बनवा.
  • यानंतर या पेस्टने शरीरावर चांगला मसाज करा.
  • 20 मिनिटांच्या मसाजनंतर आंघोळ करा. यामुळे देखील बॉडीला एक शाईन येईल आणि त्वच्या निरोगी राहील.
  • Body polishing साठी कोरफड जेल आणि मध हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे.
  • एलोवेरा जेलमध्ये मधाचे काही थेंब टाका आणि ते मिक्स करा.
  • यांनतर याच्या मिश्रणाने शरीराला मसाज करा, आणि मग १५ मिनिटांनी स्वच्छ पाण्याने आंघोळ करा. यामुळे त्वचेची पोत सुधारेल.

हेही वाचा :

Beauty Tips : हाता पायाचे टॅनिंग कसे घालवाल, वापरा ‘या’ टीप्स

- Advertisment -

Manini