घरमुंबईमॉरिशसमधील मराठी भवनाला मुख्यमंत्र्यांतर्फे देणगी - देवेंद्र फडणवीस

मॉरिशसमधील मराठी भवनाला मुख्यमंत्र्यांतर्फे देणगी – देवेंद्र फडणवीस

Subscribe

मुंबई : मॉरिशसमधील मराठी भवनाला 25 वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकराने देणगी दिली होती. त्याचा दुसरा पार्ट म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देणगी मान्य केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी दिली आहे.

मॉरिशसमध्ये सुमारे 75 हजार मराठी बांधव असून ते पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोकण भागातून आहेत. त्यांनी आपलr मराठी परंपरा, संस्कृती जोपासली आहे. या मराठी बांधवांच्या सुमारे 54 संघटना असून, या सर्व संघटनांचा मिळून मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन स्थापन करण्यात आला आहे. या फेडरेशनची स्थापना 1 मे 1960 रोजीच झाली. शिवजयंती, महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात येथे साजरे होतात. येथे एक महाराष्ट्र भवनसुद्धा उभारण्यात आले असून, त्याच्या विस्तारासंदर्भात सुद्धा काही मागण्या आहेत. या दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यादृष्टीने काही महत्त्वपूर्ण घोषणा होऊ शकतात. या टप्पा-2 साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 8 कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे. मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ए. गानू यांनी 8 मार्च 2023 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी तसेच महाराष्ट्र भवनाच्या पुढील विस्तारासंबंधी आपलं मनोदय व्यक्त केलं होतं.

- Advertisement -

मॉरिशियसमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय समाज असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मराठी लोकसंख्या आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या मराठी भवनात आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याचे येत्या 28 तारखेला मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ (Prime Minister of Mauritius Pravindra Kumar Jagannath) आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnvis) यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे.

या दौर्‍यात मॉरिशस-इंडिया बिझनेस कम्युनिटीसोबत सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेटणार असून, काही सामंजस्य करारावर सुद्धा स्वाक्षरी होणार आहेत. या दौऱ्यात पर्यटन अणि उद्योग क्षेत्रात महत्वाचे करार अपेक्षित आहेत. मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराजसिंग रुपून यांना सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेटणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -