Sunday, April 21, 2024
घरमानिनीगोडा मसाला कसा बनवायचा?

गोडा मसाला कसा बनवायचा?

Subscribe

गरम मसाला आणि गोडा मसाला हा आपल्या किचनमध्ये असायलाच हवा. गोडा मसाला प्रामुख्याने मसाले भात, भरली वांगी, वेगवेगळ्या आमटीत वापरला जातो.

आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात अनेक मसाल्यांचा वापर केला जातो. त्यातही काही विशिष्ट भाज्यांसाठी, उसळींसाठी काही ठराविक मसाले आवर्जुन वापरले जातात. गरम मसाला आणि गोडा मसाला हा आपल्या किचनमध्ये असायलाच हवा. गोडा मसाला प्रामुख्याने मसाले भात, भरली वांगी, वेगवेगळ्या आमटीत वापरला जातो. यातील दगड फूलामुळे पदार्थाची चवच बदलते. गोडा मसाल्यात अनेकजण आवडीप्रमाणे वेगवेगळे मसाले वापरतात.

साहीत्य- ५०० ग्रॅम धने, १०० ग्रॅम जीरे, १० ग्रॅम दालचिनी , १० ग्रॅम लवंग १० ग्रॅम तेज पत्ता, १० ग्रॅंम दगड फूल, १० ग्रॅम नागकेसर, १० ग्रॅम ओवा, १० ग्रॅम हिंग , २० ग्रॅम हळद, १० ग्रॅम मेथीचे दाणे, १०० ग्रॅम तीळ, १२५ ग्रॅंम किसलेले खोबरं, १२५ ग्रॅंम लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, ५- ६ टेबलस्पून तेल.

- Advertisement -

कृती- एक मध्यम आकाराची कढई  मंद आचेवर गरम करून घ्या. कढई गरम झाली की त्यात वरील मसाले वेगवेगळे सुगंध येईपर्य़ंत भाजून घ्या. नंतर ते एका मोठ्या ताटात थंड करण्यास ठेवा.

- Advertisement -

त्यानंतर पुन्हा कढईत तेल गरम करून त्यात हे मसाले एकत्र भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमधून त्याची पावडर करा. गोडा मसाला तयार. हा मसाला हवाबंद डब्यात बंद करून ठेवा. मसाले भात, डाळ वांगी, कडधान्यांच्या उसळींमध्ये हा मसाला वापरा.

- Advertisment -

Manini