Tuesday, April 30, 2024
घरमानिनीReligiousवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

नातरी सरोवर आटलें । रानीं दुःखिया दुःखी भेटलें । कां वांझ फुलीं फुललें । झाड जैसें ॥
किंवा मोठा तलाव असून तो जर आटला, तसेच रानात एका दुःखी कष्टी मनुष्यास दुसरा तसाच भेटला, अथवा ज्याप्रमाणे वांझ फुलांनी एखादे झाड फुलले,
तैसें सकळ तें वैभव । अथवा कुळ जाति गौरव । जैसें शरीर आहे सावेव । परि जीवचि नाहीं ॥
त्याचप्रमाणे, सर्व वैभव, कुल अथवा जातीचा मोठेपणा व्यर्थ होय. जसे सर्व अवयवांनी युक्त शरीर असून त्यात फक्त जीव नसावा,
तैसें माझिये भक्तीविण । जळों तें जियालेंपण । अगा पृथ्वीवरी पाषाण । नसती काई? ॥
त्याचप्रमाणे माझ्या भक्तीशिवाय त्याचे जीवन व्यर्थ होय. अरे पृथ्वीच्या पाठीवर दगड नाहीत का.
पैं हिवराची दाट साउली । सज्जनीं जैसी वाळिली । तैसीं पुण्यें डावलूनि गेलीं । अभक्तांतें ॥
हे पहा हिवराच्या काटेरी झाडाची अगदी दाट सावली आहे, पण सज्जनांनी ती निषिद्ध मानली आहे; त्याचप्रमाणे जो माझी भक्ती करीत नाही, त्याला पुण्य डावलून (सोडून) जाते.
निंब निंबोळियां मोडोनि आला । तरी तो काउळियांसीचि सुकाळु जाहला । तैसा भक्तिहीनु वाढिन्नला । दोषांचिलागीं ॥
लिंब हा लिंबोळ्यांच्या भाराने जरी वाकला तरी त्यापासून ज्याप्रमाणे कावळ्यांनाच सुकाळ होतो, त्याप्रमाणे माझी भक्ती न करणारा पापाचीच जोड करण्याकरिता वाढतो.
कां षड्रस खापरीं वाढिले । वाढूनि चोहटां ठेविले । ते सुणियांचेचि ऐसे झाले । जियापरी ॥
किंवा ज्याप्रमाणे षड्रस अन्नांनी भरलेले खापर चव्हाट्यावर ठेविले म्हणजे कुत्र्याच्याच उपयोगाला येते,
तैसें भक्तिहीनाचें जिणें । जो स्वप्नींहि परि सुकृत नेणें । तेणें संसारदुःखासि भाणें । वोगरिलें ॥
त्याप्रमाणे जो स्वप्नातही पुण्यमार्गाचे आचरण जाणत नाही, त्या भक्तिहीनाचे जिणे म्हणजे संसारदुःखाचे ताट वाढून ठेवल्याप्रमाणेच होय.

- Advertisment -

Manini