Saturday, May 4, 2024
घरमानिनीHealthअत्याधिक मीठ खाण्यापासून असे रहा दूर

अत्याधिक मीठ खाण्यापासून असे रहा दूर

Subscribe

अन्नपदार्थांना चव येण्यासाठी आपण मीठाचा वापर करते. मात्र याचा अधिक वापर केल्याने शरीरात काही प्रकारचे आजार उद्भवू शकतात. यामुळे मीठाचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे असा सल्ला दिला जातो. अशातच अत्याधिक प्रमाणात मीठ खाणे टाळण्यासाठी पुढील काही टीप्स जरुर फॉलो करा.डब्लूएचओच्या मते, लोकांनी दररोज 5 ग्रॅम मीठ खाल्ले पाहिजे. कोणत्यागी वयात अधिक मीठ खाल्ल्याने ब्लड प्रेशर आणि हृदयासंबंधित काही आजारांचा धोका वाढला जाऊ शकतो.

-ताजे अन्नपदार्थ खा
फ्रेश फ्रुट्स, अन्नपदार्थ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये मीठाचे प्रमाण अधिक नसते. त्यामुळे आपल्या डाएटमध्ये फ्रोजन फूड्सचा वापर कमी करावा.

- Advertisement -

-फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ
फ्रिजमध्ये अधिक दिवस पदार्थ स्टोर केल्याने त्यामध्ये सोडियमचे प्रमाण वाढले जाते. त्यामुळे खुप दिवस फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ खाण्यापासून दूर रहा.

-फास्ट फूड
पॅकिटबंद फूड्स किंवा फास्ट फूडमध्ये मीठाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरीरात मीठाचे प्रमाण मर्यादित ठेवायचे असेल तर असे पदार्थ खाणे टाळा.

- Advertisement -

काय खावे?
पनीर आणि बटरमध्ये अत्याधिक प्रमाणात सोडियम असते. त्या ऐवजी तुम्ही कमी सोडियम असणारे पदार्थ खाऊ शकता. या व्यतिरिक्त सॉल्टेड बटरऐवजी अनसॉल्टेड बटर खा.

मीठाचा कमी वापर करण्यासाठी
जर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये सोडियमचे प्रमाण कमी करायचे असेल तर खाण्यात मीठाचे मर्यादित सेवन करू शकता. या व्यतिरिक्त पदार्थावर वरुन मीठ टाका.

कोणत्या प्रकारचे मीठ खरेदी कराल?
बाजारात लो सोडियम मीठ मिळते. त्यात सामान्य मीठाच्या तुलनेत कमी सोडियम असते ते तुम्ही वापरू शकता.


हेही वाचा- हेल्दी फूड म्हणून ‘हे’ पदार्थ खाणे टाळा

- Advertisment -

Manini