चेहऱ्याची त्वचा कायम छान राहावी असे आपल्याला नेहमी वाटत असते. अशातच या चेहऱ्यासाठी आपण खास निगा राखतो आणि त्यासाठी खूप प्रयत्न देखील सतत करत असतो. महागड्या क्रीम आणि बाहेरचे प्रॉडक्ट्स वापरून देखील चेहऱ्यावर त्याचा काहीच परिणाम जाणवत नाही. पण मग नेमक्या कोणत्या गोष्टी चेहऱ्यासाठी करायला हव्यात हे आपण जाणून घ्यायला हवं.
उन्हाळ्याचा दिवसात चेहऱ्याची फारच काळजी वाटत असते पण नेमकं काय करायला हवं हे आपण थोडक्यात जाणून घेऊया-
- चेहऱ्यावर कधीही साबण लावू नका. चेहरा वॉश करण्यासाठी फेसवॉश लावून चेहरा स्वच्छ करा.
- उन्हाळ्यात चेहरा थंड पाण्याने धुवा कारण थंड पाणी त्वचेसाठी उत्तम असते.
- आंघोळीनंतर चेहऱ्याला मॉश्चरायझर लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते.
- प्लॅन चेहऱ्यावर कधीही मेकअप लावू नका. कारण हा मेकअप पोअर्सच्या आत जातो. ज्यामुळे स्किन डॅमेज होऊ शकते.

- मेकअप करण्यापूर्वी मॉश्चरायझर घेऊन त्यात फाऊंडेशन घाला आणि मग तो लावा.
- यामुळे फेसला हानी होणार नाही. त्वच्या चांगली राहण्यासाठी सनस्क्रिन लावायला विसरु नका.
- त्वचेला पिंपल्स आले असतील तर त्याला सतत हात लावू नका. कारण हाताच्या उष्णतेमुळे पिंपल्स वाढू शकतात.
- तेलकट त्वचा असणाऱ्यांनी कधीही त्वचेवर दही, तेल असे घटक लावू नये कारण त्यामुळे त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात.
- Advertisement -
हेही वाचा :
Skin Care : आंघोळीसाठी ‘हे’ आहेत Best Body wash
- Advertisement -
- Advertisement -