घरताज्या घडामोडीबारसू रिफायनरी वाद : आंदोलनाच्या प्रतिनिधींनी घेतली शरद पवारांची भेट; 'या' विषयांवर...

बारसू रिफायनरी वाद : आंदोलनाच्या प्रतिनिधींनी घेतली शरद पवारांची भेट; ‘या’ विषयांवर चर्चा

Subscribe

बारसु येथे होत असलेल्या रिफायनरीला कोकणवासियांनी कडाडून विरोध केला आहे. सध्या हे आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. अशातच या आंदोलनाचे नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

बारसु येथे होत असलेल्या रिफायनरीला कोकणवासियांनी कडाडून विरोध केला आहे. सध्या हे आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. अशातच या आंदोलनाचे नेतृत्व करणारे सत्यजीत चव्हाण यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत स्वतः शरद पवार यांनी आज ट्विट करीत माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील उपस्थित होते.

शरद पवारांच्या ट्वीटमध्ये काय?

- Advertisement -

”बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे सत्यजीत चव्हाण आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.” असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे. (Satyajit Chavan Who Leader Of Barsu Refinery Protest Movement Met Sharad Pawar)

बारसु रिफायनरीवरून आता राज्यातील राजकारण तापलं आहे. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. नुकताच उद्योगमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी “बारसुप्रकरणी एक व्हिडीओ आला होता. रिफायनरीमध्ये कशाप्रकारे प्रदुषण होत आहे. हे त्या व्हिडीओमध्ये दाखवले जात आहे. त्यामुळे अशा जुन्या व्हिडीओ लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला त्यांची समजूत काढता येणार नाही. बारसूचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही जिल्ह्यातील नेतेमंडळी सक्षम आहोत”, असे उदय सामंत म्हणाले.

- Advertisement -

“विनायक राऊतही एका बैठकीच्या निमित्ताने आमच्यासोबत होते. त्यांनीही त्यावेळी सांगितले की, आमची टोकाची भुमिका नाही, प्रकल्प झाला पाहिजे पण, प्रकल्प होत असताना स्थानकांच्या सर्व शंकांचे निरसन झाले पाहिजे. यात आमचे कुठे काय मत आहे? माझेही तेच मत आहे”, असेही उदय सामंत म्हणाले.


हेही वाचा – ‘राऊत, अंधारेंना उत्तर देण्यासाठी आम्ही रिकाम टेकडे नाही’, उदय सामंतांचा हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -