घरमनोरंजनमार्चमध्ये अनंत-राधिकाचा आगळावेगळा प्री-वेडिंग सोहळा; पत्रिका होतेय व्हायरल

मार्चमध्ये अनंत-राधिकाचा आगळावेगळा प्री-वेडिंग सोहळा; पत्रिका होतेय व्हायरल

Subscribe

रिलायन्स उद्योग समूहाचे मालक आणि भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा 19 जानेवारी 2023 रोजी साखरपुडा पार पडला होता. तेव्हापासून अनेकदा सोशल मीडियावर अनंत आणि राधिकाची जोडी चर्चेत असते. साखरपुडा झाल्यानंतर हे दोघेही नक्की कधी लग्न करणार आहेत. याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाच्या प्री वेडिंग सोहळ्याची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. दरम्यान, अशातच आता पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाआधीच्या काही कार्यक्रमांची नवीन पत्रिका व्हायरल होत आहे.

अनंत-राधिकाच्या लग्नाची नवीन पत्रिका व्हायरल

- Advertisement -

सध्या जामनगर येथे अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याची सुरुवात झाली असून यादरम्याचे काही फोटो सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतीच एक नवीन पत्रिका व्हायरल होतेय ज्यामध्ये 1 ते 3 मार्चपर्यंत काही प्री-वेडिंग फंक्शन आयोजित करण्यात आले आहेत. जामनगरमध्ये होणाऱ्या सोहळ्यात बॉलिवूड आणि व्यावसायिक तसेच हॉलिवूडमधील सेलिब्रिटीही उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

प्री-वेडिंगची सुरुवात 1 मार्च रोजी संध्याकाळी 5.30 वाजता कॉकटेल पार्टीने होईल. यानंतर 2 मार्च रोजी दोन कार्यक्रम होतील. एका कार्यक्रमाचे नाव ‘अ वॉक ऑन द वाइल्ड साईड’ आणि दुसऱ्याला ‘मेला’ असे आहे.

‘अ वॉक ऑन द वाइल्ड साईड’साठी पाहुण्यांना असा पोशाख घालावा लागेल ज्याची थीम जंगलाशी जुळती असेल. 3 मार्च रोजी पाहुण्यांसाठी लंच आणि डिनरचे आयोजन केले जाईल, जिथे त्यांना 2500 हून अधिक पदार्थ दिले जातील.

‘हे’ कलाकारही राहणार उपस्थित

बॉलिवूड कलाकार शाहरुख खान , अमिताभ बच्चन, जान्हवी कपूर यांच्यासह काही हॉलिूवूड सेलिब्रिटी आणि व्यावसायिक देखील लग्नात सहभागी होणार आहेत. या यादीमध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, ब्लॅक रॉक सीईओ लॅरी फिंक, फेसबुक मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग, डिस्ने सीईओ बॉब इगर, हॉलिवूड गायिका रिहाना यांचा समावेश आहे. तसेच अनंत आणि राधिका जुलै 2024 मध्ये लग्न करणार आहेत.

 


हेही वाचा : कोणी बिझनेसमॅन, कोणी नोकरी ‘या’ सेलिब्रिटींनी सोडलं अभिनयक्षेत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -