घरमहाराष्ट्रNarendra Modi : सारा खेळ खुर्चीचा; सभा मोदींची आणि खुर्च्यांवर फोटो राहुल...

Narendra Modi : सारा खेळ खुर्चीचा; सभा मोदींची आणि खुर्च्यांवर फोटो राहुल गांधींचे, काय आहे प्रकार?

Subscribe

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. महिला बचत गटाच्या मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात दोन लाखांहून अधिक महिला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मोदींच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्षासह शिवसेनेनंही जोरदार तयारी केली आहे. मात्र, या तयारीपेक्षा, मोदी काय बोलतील यापेक्षाही जास्त चर्चा सभेतील खुर्च्यांची आहे. कारण या सभेतील खुर्च्यांवर चक्क राहुल गांधी यांचे फोटो आहेत.

चर्चा सभास्थळावरील खुर्च्यांची

मोदींच्या सभास्थळी असलेल्या खुर्च्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मोदींच्या या सभेसाठी यवतमाळमध्ये तब्बल ९ लाख चौरस फुटांवर मंडप उभारण्यात आला आहे. त्यासाठी येथे लाखो खुर्च्या मांडण्यात आल्या आहेत. यातील बऱ्याच खुर्च्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे फोटो आहेत. ते पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आहे. दरम्यान, यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर या खुर्च्यांवरचे स्टिकर्स काढण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Vijay Wadettiwar : “होऊ दे खर्च”; मोदींसाठी 12 कोटींचा चुराडा; वडेट्टीवारांचे टीकास्त्र

सभा नवी पण खुर्च्या जुन्याच

काही महिन्यांपूर्वी राहुल गांधींची नागपुरात सभा झाली. त्यावेळी वापरण्यात आलेल्या खुर्च्याच कंत्राटदारानं यवतमाळमध्ये होत असलेल्या सभेसाठी पाठवल्या होत्या. या खुर्च्यांवर लावलेले राहुल गांधींचे फोटोंचे स्टिकरदेखील काढलेले नाहीत. त्यामुळे मोदींच्या सभेला असलेल्या खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर आणि त्यावर स्कॅन टू डोनेट असं आवाहन आहे. या खुर्च्यांची सध्या परिसरात चर्चा आहे. मोदींची सभा ४ वाजता होणार आहे.

- Advertisement -

खुर्च्यांपूर्वी चर्चा भावना गवळी यांच्या बॅनरची

पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी स्थानिक खासदार भावना गवळींनी लावलेल्या स्वागताच्या पोस्टरची मंगळवारी बरीच चर्चा झाली. त्यांच्या होर्डिंगवर केवळ पंतप्रधान मोदी आणि भावना गवळी यांचे फोटो होते. गवळींनी त्यांच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो टाळले होते. त्यामुळे गवळींच्या नाराजीची चर्चा झाली. सध्या विद्यमान खासदार असलेल्या भावना गवळी यांची उमेदवारी निश्चित मानली जात नसल्यानं गवळी नाराज असल्याचं कळतं.

हेही वाचा – Sanjay Raut : “अमित शाहांचे वक्तव्य हास्यास्पद”, परिवारवादाच्या मुद्द्यावरून राऊतांचा टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -