घरताज्या घडामोडीCM Eknath Shinde : कालची सभा फॅमिली गॅदरींग; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची इंडिया...

CM Eknath Shinde : कालची सभा फॅमिली गॅदरींग; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका

Subscribe

कालची सभा एक फॅमिली गॅदरींग होती, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क मैदानात झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका केली. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.

कालची सभा एक फॅमिली गॅदरींग होती, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क मैदानात झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका केली. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते.

“कालची सभा एक फॅमिली गॅदरींग होती, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एक अशी कहावत आहे की, भानुमती का कुनबा कैसे कटे कैसे रोके म्हणजेच चेहऱ्यावर नैराश्य असलेले लोक ज्यांना लोकांनी तडीपार आणि हद्दपार केले ते आले होते. उत्तर प्रदेश, कश्मीर, बिहारमधून आले होते. एकंदरीत पाहिलं तर धरून बांधून आणलेली लोक असतात तस, त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होते”, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीच्या सभेवर टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -