Saturday, April 27, 2024
घरमानिनीKitchenMethi Laddu : सोप्या पध्द्तीने बनवा पौष्टिक मेथी लाडू

Methi Laddu : सोप्या पध्द्तीने बनवा पौष्टिक मेथी लाडू

Subscribe

मेथी कफनाशक आणि पित्तनाशक असल्याने हिवाळ्यात सर्दी – खोकल्यासारखे आजार होत नाहीत. अशाच मेथी लाडूची रेसिपी आपण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

- Advertisement -

साहित्य :

  • 50 ग्रॅम मेथी पावडर
  • 2 वाट्या गव्हाचे पिठ (कणिक)
  • 1 वाटी किसलेले सुके खोबरे
  • 1 वाटी खारीक पावडर
  • 50 ग्रॅम डिंक (ऑप्शनल)
  • 50 ग्रॅम खसखस
  • अडीच वाटी पिठी साखर
  • अडीच वाटी तूप
  • सुकामेवा
  • वेलची पूड
  • जायफळ पूड

कृती : 

Recipe of Quick Methi Laddoo (Fenugreek Seeds Laddoo) | Moms Recipes

 

  • सर्वात आधी खसखस भाजून त्याची पावडर करून घ्यावी. त्यांनतर तुपात मेथी पावडर किमान 10-12 तास भिजवून ठेवावी.
  • मग सुके खोबरे किसून भाजून घ्यावे त्यात 2 वाट्या तूप कढईत घालून त्यात डिंक तळून घ्यावा.
  • डिंक बाजूला काढून उरलेल्या तुपात गव्हाचे पिठ खमंग भाजून घ्यावे.
  • गॅस बंद करून त्यात भिजवलेली मेथी पावडर, खारीक पावडर, खसखस पावडर, किसून भाजलेले खोबरे, वेलची पूड, जायफळ पावडर, सुकामेवा, तळलेला डिंक, पिठीसाखर घालून मिश्रण गरम असतानाच त्याचे लाडू वळावे.
  • अशाप्रकारे मेथीचे पौष्टिक लाडू बनवा तेही सोप्या पद्धतीने.

हेही वाचा :

Barfi : सणा-सुदीला बनवा रवा-नारळ बर्फी

- Advertisment -

Manini