मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या (Mumbai) सायन रुग्णालयात (sion hospital mumbai) नवजात बालिकेला टॉयलेटच्या कचऱ्यात टाकण्यात आलं होतं. त्यामुळे नवजात बालिकेचा मृत्यू झाला.
नवजात बालिका टॉयलेटमध्ये सापडल्याने खळबळ उडाली. त्यानंतर डॉक्टरांच्या टीमने तातडीने तिची तपासणी केली. पण तो पर्यंत खुपच उशिर झाला होता. डॉक्टरांनी नवजात बालिकेचा मृत्यू झाल आहे असं घोषित केले.
मुंबई पोलिसांनी माहिती मिळताच अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायन रुग्णालयात (sion hospital)ही घटना घडली आहे. 8 डिसेंबर रोजी सायन रुग्णालयाच्या शौचालयाच्या कचऱ्यात एका मुलीचा मृतदेह आढळून आला होता. सायन येथील लोकमान्य टिकळ रूग्णालायातील (Lokmanya Tilak Municipal Medical College and General Hospital) काम करणाऱ्या सफाई कर्मचारी सरस्वती डोंगरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सरस्वती डोंगरे या नेहमीप्रमाणे कामावर गेल्या. त्यांनतर सकाळी त्या रूग्णालयातील अपघात विभागातील टॉयटेलमध्ये करचा गोळ्या करण्यासाठी गेल्या. मात्र तेव्हा त्यांना कचऱ्याची बादली नेहमीपेक्षा खुपच जड वाटली. त्यामुळे त्यांनी ती नीट उघडून पाहिली असता, त्यामध्ये एका काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये नवजात अर्भक आढळले.
The body of a newborn girl was found in the toilet waste of Mumbai’s Sion Hospital on Dec 8. Doctors immediately examined the newborn and she was declared dead. In this matter, the police have registered a case against an unknown person and started further investigation: Mumbai…
— ANI (@ANI) December 8, 2023
त्यानंतर डोंगरे यांनी सर्व घडलेल्या घटनेची माहिती तातडीने त्यांच्या वरिष्ठांना दिली. त्यानंतर त्या नवजात बाळाला पिशवितून बाहेर काढून तातडीने तिची तपासणी केली, मात्र तोपर्यंत त्या नवजात बालिकेचा मृत्यू झाला होता.
या सर्व घटेनेची माहिती रूग्णालय प्रशासनाने शिव पोलिसांनी दिली. त्या नवजात बालिकेचा घातपात केला का? कोणी केला? आणि कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र याप्रकरणी शीव पोलिसांनी एका महिलेविरूध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.