घरमनोरंजनमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना केतकीची कळकळीची विनंती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना केतकीची कळकळीची विनंती

Subscribe

सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून घराघरात पोहोचलेली गायिका केतकी माटेगावकर आता उत्तम अभिनेत्री देखील झाली आहे. ‘तानी’, ‘शाळा’, ‘काकस्पर्श’, ‘टाइमपास’,टाइमपास 2 ‘फुंतरू’ यांसारख्या चित्रपटातून तिनं आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.मीडियावर तिला बरेच लोक फॉलो करतात.

केतकी अनेकदा वेगवेगळ्या विषयांचे मुद्दे आपल्या सोशल मीडिया अकाउंट मार्फत चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. आता पुन्हा एकदा तिने अशी काही पोस्ट केली आहे ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. विशेष म्हणजे ही पोस्ट तिने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केले आहे. तसेच आपल्या पोस्टमार्फत तिने सर्वांना एक उत्तम आवाहन केले आहे.

- Advertisement -

केतकीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, हा फोटो! तुम्हाला यात काय दिसते? निसर्ग सौंदर्य. जेव्हा मला यात विकास दिसतो तेव्हा मला फार अभिमान वाटतो. पण निसर्ग सौंदर्याशी तडजोड करून विकास झाला तर? मग मला माझे मन दुखावल्यासारखे वाटते!

 मी स्वतः टॉवरमध्ये राहते. पण जेव्हा मी खिडकीतून बाहेर पाहते तेव्हा मला झाडं दिसतच नाही. दिसते ते फक्त काँक्रीटचे जंगल! तेव्हा मला खरंच अपराधीसारखे वाटतं. यावर आपण मिळून काही करू शकतो का?
उद्या मुलं आम्हाला कंटाळा आलाय असं म्हणाले तर तेव्हा पालक त्यांना कुठे घेऊन जातात? मॉल्स? आर्केड? आम्हालाही सर्वांना तिथे जायला आवडते. पण ते त्यातच सर्व आलं का? आपण ज्या पंचतत्वांनी बनलो आहोत त्याला ते आपल्याला जोडू शकतात का?

- Advertisement -

आपला देश छान हिरवागार असावा एवढंच माझं स्वप्न आहे !! जेव्हा आपण म्हणतो की, भारत ही पुढची महासत्ता असेल, तेव्हा भारताला नैसर्गिकदृष्ट्या सक्षम केले पाहिजे. भारत एक कृषीप्रधान देश ! सर्वात हिरवागार देश!! आपण तो घडवून आणू शकतो का? मी माझे काम करत आहे. मी आता पुढाकार घेत आहे. तुम्हीही कराल?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -